Marathi बायबल
दानीएल total 12 अध्याय
दानीएल धडा 9
1 दारयावेश राजाच्या कारकिर्दोच्या पहिल्या वर्षातच ह्या गोष्टी घडल्या. दारयावेश हा अहश्वेरोशाचा मुलगा होता. तो मेदी वंशातील होता. तो बाबेलचा राजा झाला.
2 दारयावेश गादीवर बसला,त्या वर्षो मी, दानीएल काही ग्रंथ वाचीत होतो. त्या ग्रंथात असे लिहिले होते की परमेशवराने यिर्मयाला सांगितले,”70वर्षांनंतर यरुशलेम पुन्हा वसविले जाईल.
3 मग मी देव माझा प्रभू ,याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली.
दानीएल धडा 9
4 मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस.
5 पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो.
दानीएल धडा 9
6 आम्ही संदेष्ट्यांचे ऐकले नाही. ते तुझे सेवक होते. ते तुझ्यावतीने आमच्या राजाशी, नेत्यांशी, थोर मंडळींशी बोलले. इस्राएलमधील सर्व लोकांशी ते बोलले पण आम्ही त्या संदेष्ट्यांचे ऐकले नाही.
7 “परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. आणि चांगुलपणा तुझ्यातच आहे. पण आज आमच्याकडे फक्त अप्रतिष्ठा आहे. आणि यरुशलेमच्या लोकांजवळ फक्त अपमान आहे. इस्राएलच्या लोकांजवळ मग ते जवळ असोत की लांब अपमानाखेरीच काही नाही. परमेशवरा, तू त्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरून टाकलेस आणि अशा, सर्व राष्ट्रांत राहाणाऱ्य, इस्राएलच्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. परमेश्वरा तुझ्याविरुध्द केलेल्या वाईट कर्मामुळे त्यांना शरम वाटायला पाहिजे.
दानीएल धडा 9
8 “परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.
9 [This verse may not be a part of this translation]
10 आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे ऐकले नाही परमेशवराने त्याच्या सेवका मार्फत संदेष्ट्यांमार्फत आम्हाला नियम सांगितले पण आम्ही त्या नियमांचे पालन केले नाही.
दानीएल धडा 9
11 तुझी शिकवण इस्राएलच्या एकाही माणसाने मानली नाही. त्या सर्वानी तुझ्याकडे पाठ फिरविली त्यांनी तुझे ऐकले नाही मोशेच्या नियमांत शाप आणि वचने लिहिलेली आहेत (मोशे देवाचा सेवक होता). त्या शापांत आणि वचनांत, नियमांचे लालन न केल्यास होणाऱ्या शिक्षेबद्दल सांगितले आहे आणि त्या सर्व गोष्टी आमच्याबाबतीत घडल्या आहेत. आम्ही परमेश्वरा विरुध्द पाप केले, म्हणूनच असे घडले.
12 “देवाने ह्या गोष्टी आमच्या आणि आमच्या नेत्यांच्या बाबतीत घडतील असे सांगितले आणि तशा त्या घडवूनही आणल्या. त्याने आमच्यावर वाईट प्रसंग आणले. यरुशलेमने जे सोसले ते दुसऱ्या कोणत्याही नगराने सोसले नाही
दानीएल धडा 9
13 आमच्याबाबतीत सर्व भयंकर गोष्टी घडल्या मोशेच्या नियमांत लिहिल्याप्रमाणेच सर्व घडले. पण अजूनही आम्ही परमेशवराची करूणा भाकली नाही. अजूनही आम्ही पाप करीतच आहोत परमेश्वरा, अजूनही आम्ही, तुझ्या सत्याकडे, लक्ष दिलेले नाही.
14 परमेशवराने भयानक संकटे आमच्यासाठी निर्माण करून ठेवली आणि त्याने ती आमच्यावर आणली. परमेश्वराची प्रत्येक कृती न्याय असल्यामुळेच. त्याने हे घडवून आणले पण अजूनही आपण परमेश्वराचे ऐकले नाही.
दानीएल धडा 9
15 “परमेशवर, आमच्या देवा, तू तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आम्हाला मिसरमधून बाहेर आणलेस, आम्ही तुझे आहोत तुझ्या ह्या कृतीमळे आजही तुझी ख्याती आहे. परमेशवरा, आम्ही पाप केले. आम्ही भयानक कृत्ये केली.
16 परमेश्वरा तू योग्य त्याच गोष्टी करतोस. तू न्याय जाणतोस. त्यानुसार तुझे शहर जे यरुशलेम त्याच्यावरचा तुझा राग काढून घे. यरुशलेम हा तुझा पवित्र पर्वत आहे. आमच्या सभोवतालचे लोक आमचा अपमान करतात आणि तुझ्या लोकांची चेष्टा करतातय. ह्याचे कारण आम्ही आणि आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले, हेच होय.
दानीएल धडा 9
17 आता परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.मी तुझा दास आहे, माझी मदतीसाठी केलेली प्रार्थना ऐक, तुझ्या पवित्र स्थानाचे भले कर . तुझे पवित्र स्थान ओसाड पडले आहे. पण प्रभु तुझ्या चांगल्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी कर.
18 माझ्या देवा, माझा धावा, ऐक. डोळे उघडून आमच्यावर आलेली भयानक संकटे पाहा. तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीची काय अवस्था झाली आहे ती पाहा.”आम्ही चांगले आहोत” असे मी म्हणत नाही. त्याकरिता मी ह्या गोष्टी मागत नाही, तर तू दयाळू आहेस हे मला ठाऊक आहे म्हणून मी तुझ्याकडे ह्या गोष्टी मागत आहे.
दानीएल धडा 9
19 परमेशवरा, माझे ऐक आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, आमच्याकडे लक्ष दे आणि आमच्यासाठी काहीतरी कर.आता वाट पाहू नकोस! आताच काहीतरी कर. तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी कर. परमेश्वरा तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीसाठी आणि तुझ्या लोकांसाठी काहीतरी आताच कर!”
20 मी देवाजवळ ही प्रार्थना करीत होतो, मी त्याला माझ्या आणि इस्राएलच्या लोकांच्या पापांबद्दल सांगत होतो, मी परमेश्वराच्या पवित्र पर्वतासाठी प्रार्थना करीत होतो.
दानीएल धडा 9
21 तेवढ्यात गाब्रिएल माझ्याकडे आला दृष्टान्तात मी ज्याला पाहिले होते तोच हा गाब्रिएल. तो घाईघाईने उडत माझ्याकडे आला. संध्याकाळच्या अर्पणाच्या वेळेला तो आला.
22 मला जाणून घ्यावयाच्या होत्या त्या गोष्टी समजावून घेण्यास गाब्रिएलने मला मदत केली. तो म्हणाला,”दानीएला, मी तुला ज्ञान देण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आलो आहे.
23 तू प्रार्थनेला सुरवात करता क्षणीच, आज्ञा मिळाली व ती तुला सांगायला मी आलो. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो तूला ही आज्ञा व दुष्टान्त समजेल. .
दानीएल धडा 9
24 दानीएला, देवाने तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या पवित्र नगरीसाठी 70 आठवडे दिले आहेत. हे 70 आठवडे, वाईट गोष्टी व पाप करावयाचे सोडून द्यावे, लोकांना पवित्र करावे कायम राहाणारा चांगुलपणा आणावा,दुष्टान्त व संदेष्टे यांच्यावर शिक्कामोर्तब करावे, आणी पवित्र स्थान देवासाठी अर्पण केले जावे म्हणून दिले आहेत.
25 दानीएल, ह्या गोष्टी शिकून, समजावून घे. परत जा व यरुशलेम वसवा,” हा संदेश मिळाल्यापासून निवडलेला राजा येईपर्यंतचा काळ सात आठवड्यांचा असेल मग यरुशलेम पुन्हा वसविली जाईल. यरुशलेममध्ये पुन्हा लोकांना एकत्र येण्यासाठी जागा बांधल्या जातील. नगरीच्या संरक्षणासाठी नगरीभोवती चर असेल. आठवड्यांत यरुशलेम वसविली जाईल पण ह्या काळात खूप संकटे येतील.
दानीएल धडा 9
26 62आठवड्यानंतर निवडलेला माणूस ठार मारला जाईल तो गेलेला असेल . मग भावी नेत्याचे लोक नगरीचा आणि पवित्र स्थानाचा नाश करली हा शेवट पुराप्रमाणे येईल अखेरपर्यंत युध्द चालू राहील त्या जागेचा संपूर्ण नाश करण्याची आज्ञा देवाने दिली आहे.
27 मग भावी नेता पुष्कळ लोकांबरोबर एक करार करील. तो करार एक आठवड्याचा असेल आठवड्याच्या मध्येच अर्पणे व बळी देणे बंद होईल. मग विध्वंसक येईल तो भयानक विध्वंसक कृत्ये करील पण देवानेच त्याला संपूर्ण विनाशाची आज्ञा केलेली आहे.”