निर्गम धडा 2
7 मग आतापर्यत लपून बसलेली ती बाळाची बहीण राजकन्येकडे गेली व म्हणाली, “या बाळाची काळजी घेण्यासाठी मी जाऊन एखादी इब्रीदाई शोधून आणू का?”
8 राजकन्येने उत्तर दिले, “होय कृपाकरून लवकर घेऊन ये.” तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली.
9 राजकन्या त्या बाईला म्हणाली, “बाई, ह्या बाळाला घरी घेऊन जा, व माझ्याकरिता त्याला दूध पाज आणि त्याची चांगली काळजी घे; त्याबद्दल मी तुला मोबदला देईन.” तेव्हा त्या बाईने ते बाळ घेतले आणि त्याची योग्य काळजी घेतली.
6