नीतिसूत्रे धडा 18
16 जर तुम्हाला महत्वाच्या माणसाला भेटायची इच्छा असेल तर त्याला नजराणा द्या. नंतर तुम्ही त्याला सहजपणे भेटू शकता.
17 सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्र विचारीत नाही.
18 दोन बलवान माणसे वाद घातल असली तर तो वाद चिठ्ठ्या टाकून सोडवणे चांगले.
19 जर तुम्ही मित्राचा अपमान केलात तर त्याला परत जिंकणे हे बळकट तटबंदी असलेले शहर जिंकण्यापेक्षा कठीण असते. आणि वादविवाद लोकांना एकमेकांपासून राजवाड्याच्या प्रवेशद्वारांवरील आडव्या बळकट खांबांइतके दूर नेतात.
8