Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 57
स्तोत्रसंहिता धडा 57

1 देवा, माझ्यावर दया कर. दयाळू हो कारण माझा आत्मा तुझ्यावर भरंवसा ठेवतो. संकटे टळेपर्यंत मी तुझ्याकडे रक्षणासाठी आलो आहे.

2 मी सर्वशक्तिमान परमेश्वराकडे मदतीसाठी प्रार्थना करीत आहे आणि देव माझी पूर्णपणे काळजी घेत आहे.

3 तो स्वर्गातून मला मदत करतो आणि मला वाचवतो. मला त्रास देणाऱ्या लोकांचा तो पराभव करतो. देव त्याचे खरे प्रेम मला दाखवतो.

स्तोत्रसंहिता धडा 57

4 माझे जीवन संकटात आहे, माझ्याभोवती माझे शत्रू आहेत. ते माणसे खाणाऱ्या सिंहाप्रमाणे आहेत. त्यांचे दात भाल्याप्रमाणे आणि बाणाप्रमाणे तीक्ष्ण आहेत आणि त्यांची जीभ तलवारीसारखी धारदार आहे.

5 देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस आणि तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे.

6 माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्‌यात पडतील.

स्तोत्रसंहिता धडा 57

7 परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील. मी त्याचे गुणगान गाईन.

8 माझ्या आत्म्या, जागा हो. सतारींनो आणि वीणांनो, तुमचे संगीत सुरु करा. आपण पहाटेला जागवू या.

9 माझ्या प्रभु, मी सर्वांकडे तुझी स्तुती करतो. मी सर्व देशात तुझ्या स्तुतीची गीते गातो.

10 तुझे खरे प्रेम आकाशातल्या सर्वांत उंचावरील ढगाहून उंच आहे.

स्तोत्रसंहिता धडा 57

11 देव स्वर्गापेक्षा खूप गौरवी आहे. त्याचा महिमा सर्व पृथ्वीवर आहे.