Marathi बायबल
प्रकटीकरण total 22 अध्याय
प्रकटीकरण
प्रकटीकरण धडा 7
प्रकटीकरण धडा 7
1 यानंतर मी चार देवदूतांना पुथ्वीच्या चार कोपऱ्यांना उभे राहिलेले पाहिले. देवदूतांनी पृथ्वीचे चारही दिशांचे वारे अडविले होते. जमिनीवर, समुद्रावर किंवा कोणत्याही झाडावर वारा वाहू नये म्हणून ते वाऱ्याला थोपवीत होते.
2 तेव्हा मी आणखी एक देवदूत पूर्वेकडून वर येताना पाहिला. या देवदूताकडे जिवंत देवाचा शिक्का होता. या देवदूताने त्या चार देवदूतांना मोठ्या आवाजात बोलाविले. हे चार देवदूत असे होते की ज्यांना देवाने पृथ्वी व समुद्राला इजा करण्याचे सामर्थ्य दिले. देवदूत त्या देवदूतांना म्हणाला,
प्रकटीकरण धडा 7
3 "मिनीला, किंवा समुद्राला किंवा झाडांना, जे देवाची सेवा करतात त्या लोकांना आम्ही शिक्का मारेपर्यंत इजा करु नका."
4 मग मी ज्यांना शिक्का मारला होता त्यांची संख्या ऐकली. इस्राएल लोकांच्या प्रत्येक वंशावर शिक्का मारला, ते एकशे चळेचाळीस हजार होते.
5 यहूदा वंशातील 12,000 लोकांना रऊबेन वंशातील 12,000 लोकांना गाद वंशातील 12,000 लोकांना
प्रकटीकरण धडा 7
6 अशेर वंशातील 12,000 लोकांना नफताली वंशातील 12,000 लोकांना मनश्शे वंशातील 12,000 लोकांना
7 शिमोन वंशातील 12,000 लोकांना लेवी वंशातील 12,000 लोकांना इस्साखार वंशातील 12,000 लोकांना
8 जबुलून वंशातील 12,000 लोकांना योसेफ वंशातील 12,000 लोकांना बन्यामिन वंशातील 12,000 लोकांना
9 यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या.
प्रकटीकरण धडा 7
10 ते मोठ्याने ओरडत होते, “तारण आमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”
11 सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणि वडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली.
12 ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्या देवाची आहेत. आमेन!”
प्रकटीकरण धडा 7
13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.” आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत.
15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मांदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील.
प्रकटीकरण धडा 7
16 त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही.
17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”