1 शमुवेल धडा 9
22 मग शमुवेलाने शौलाला व त्याच्या चाकराला बरोबर घेऊन भोजनशाळेत आणले. आणि आमंत्रितांमध्ये त्यांना मुख्य ठिकाणी बसवले; ते सुमारे तीसजण होते.
23 तेव्हा शमुवेल आचाऱ्याला म्हणाला, “जो वाटा मी तुला दिला होता व ज्याविषयी मी तुला म्हटले होते की, हा तू आपल्याजवळ वेगळा ठेव, तो आण.”
24 तेव्हा स्वयंपाक्याने फरा व त्यावर जे होते ते घेऊन शौलापुढे ठेवले. मग शमुवेल म्हणाला, “पाहा जे राखून ठेवले होते! ते खा, कारण नेमलेल्या वेळेपर्यंत ते तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहे.” कारण आता तू म्हणू शकतोस की, मी लोकांस बोलावले आहे. अशा रीतीने, त्या दिवशी शौल शमुवेलाबरोबर जेवला.
13