2 शमुवेल धडा 9
8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे?
9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे.
10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेथ याचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सीबाला पंधरा पुत्र आणि वीस नोकर होते.
7