निर्गम धडा 14
19 इस्राएली सेनेच्या पुढे चालणारा देवाचा दूत सेनेच्या मागे गेला, आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीवरून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.
20 अशा रीतीने तो मिसराचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; मेघ व अंधकार होता तरी तो रात्रीचा प्रकाश देत होता. रात्रभर एका पक्षाला दुसऱ्या पक्षाकडे जाता आले नाही.
21 मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला, तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेकडून जोराचा वारा वाहवून समुद्र मागे हटविला, असा की पाणी दुभागून मध्ये कोरडी जमीन झाली.
10