यशया धडा 17
इस्राएलाचा न्याय 4 त्या दिवसात असे होईल की, याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.
5 जेव्हा जसे कापणी करणारा उभे धान्य गोळा करताना आणि त्याच्या हाताने कणसे कापतो तसे होईल. जसे रेफाईमांच्या खोऱ्यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.
6 जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.
5