Marathi बायबल
यिर्मया total 52 अध्याय
यिर्मया धडा 41
1 पण सातव्या महिन्यात असे झाले की, अलीशामाचा मुलगा नथन्या, याचा मुलगा इश्माएल, जो राजघराण्यातला होता आणि राजाचे काही अधिकारी, त्याच्याबरोबर त्याच्या दहा मनुष्यांना घेऊन मिस्पात अहीकामाचा मुलगा गदल्याकडे आले. त्यांनी मिस्पा येथे एकत्रित बसून भोजन केले.
2 पण नथन्याचा मुलगा इश्माएल व त्याच्याबरोबरची दहा माणसे होते त्यांनी उठून शाफानाचा मुलगा अहीकाम याचा मुलगा गदल्या, ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास तलवारीने ठार मारले.
यिर्मया धडा 41
3 नंतर जे सर्व यहूदी गदल्याबरोबर मिस्पात होते त्यांना आणि जे खास्दी लढणारे ते तेथे त्यांना सापडले त्यांना इश्माएलाने ठार मारले.
4 गदल्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी, परंतु कोणालाही माहीत नसता असे झाले की,
5 शखेमातून काही माणसे, शिलोतून व शोमरोनातून ऐंशी माणसे त्यांच्या दाढ्या कापलेल्या, त्यांचे कपडे फाडलेले आणि स्वतःला जखम करून घेतलेले, परमेश्वराच्या घरात आणण्यासाठी त्यांच्या हातात अन्नार्पण व धूप होती.
यिर्मया धडा 41
6 तेव्हा नथन्याचा मुलगा इश्माएल त्यांना भेटायला मिस्पातून जसे ते गेले, चालत व रडत गेले. नंतर असे झाले की, जसा त्यांच्याशी सामना होताच, तो त्यांना म्हणाला, “अहीकामाचा मुलगा गदल्या याच्याकडे या.”
7 मग असे झाले की, जेव्हा ते नगराच्या मध्ये आले असता नथन्याचा मुलगा इश्माएल याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी त्यांची कत्तल करून आणि त्यांना खड्ड्यात फेकून दिले.
यिर्मया धडा 41
8 पण त्यांच्यातील दहा माणसे इश्माएलाला म्हणाली, “आम्हास मारु नको, कारण आमच्याजवळ गहू व सातू, तेल व मध यांचे साठे आम्ही शेतात लपवून ठेवले आहेत.” म्हणून त्याने त्यांना इतर सहकाऱ्यासारखे मारले नाही.
9 जी माणसे जिवे मारली त्या सर्वांची प्रेते इश्माएलाने गदल्याबरोबर त्या खड्ड्यात फेकून दिली होती हा मोठा खड्डा आसा राजाने खणला होता जेव्हा इस्राएलाचा राजा बाशा याने त्याच्यावर हल्ला केला होता. नथन्याचा मुलगा इश्माएल याने ज्यांना मारले होते त्यांनी तो भरला.
यिर्मया धडा 41
10
11 पुढे जे मिस्पात होते त्या इतर सर्व लोकांस इश्माएलाने पकडले, राजाच्या मुली व जे सर्व लोक मागे मिस्पात राहिले होते ज्यांना अंगरक्षकांचा प्रमुख नबूजरदान याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला त्यावर नेमले होते. म्हणून नथन्याचा मुलगा इश्माएल याने त्यांना पकडून आणि अम्मोनी लोकांकडे पार जाण्यास निघाला. पण कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी नथन्याचा मुलगा इश्माएल यानी त्यांच्याबरोबर केलेली सर्व दुष्कृत्ये ऐकली.
यिर्मया धडा 41
12 म्हणून त्यांनी त्यांची सर्व माणसे घेतली व नथल्याचा मुलगा इश्माएल ह्याच्याशी लढायला गेले. गिबोनाचे जे मोठे तलाव आहे तेथे त्यांना तो सापडला.
13 मग असे झाले की, जे सर्व लोक इश्माएलाबरोबर होते त्यांनी जेव्हा कारेहाचा मुलगा योहानान याला व जे सर्व सैन्याधिकारी त्याच्याबरोबर होते त्यांना पाहिले, ते खूप आनंदीत झाले.
14 नंतर मिस्पाहून इश्माएलाने पकडलेले सर्व लोक माघारी फिरले आणि कारेहाचा मुलगा योहानानाकडे गेले.
यिर्मया धडा 41
15 पण नथन्याचा मुलगा इश्माएल आठ मनुष्यासहीत योहानानापासून पळून गेला. ते अम्मोनी लोकांकडे गेला.
16 नथन्याचा मुलगा इश्माएल याने अहीकामाचा मुलगा गदल्या याला जिवे मारल्यावर लोकांतले जे सर्व राहिलेले मिस्पा येथून नेले होते, जे कारेहाचा मुलगा योहानान व सर्व सैन्याधिकारी यांनी सर्वांना सोडविले. गिबोनाहून योहानाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बलवान माणसे, लढणारे माणसे, स्त्रिया व मुले आणि षंढ यांना सोडवले.
यिर्मया धडा 41
17 मग ते गेले आणि बेथलेहेमाजवळ गेरूथ किम्हाम येथे थोड्या वेळेसाठी राहिले. ते मिसरात जाण्यासाठी जात होते
18 खास्द्यांच्या भीतीमुळे त्यांनी असे केले. कारण अहीकामाचा मुलगा गदल्या ज्याला बाबेलाच्या राजाने देशात अधिकारी नेमले होते त्यास नथन्याचा मुलगा इश्माएल याने जिवे मारले होते.