यहोशवा धडा 2
11 हे ऐकताच आमचे अवसान गळून गेले आणि कोणामध्येही धैर्य राहिले नाही, कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.
12 मी तुमच्यावर दया केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नावाने शपथ घ्या की, आम्हीही तुझ्या वडिलाच्या घराण्यावर दया करू, आणि मला अचूक खूण द्या,
13 तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.”
8