Marathi बायबल
स्तोत्रसंहिता total 150 अध्याय
स्तोत्रसंहिता
स्तोत्रसंहिता धडा 122
स्तोत्रसंहिता धडा 122
यरूशलेमेच्या कुशलासाठी प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र आपण परमेश्वराच्या घराला जाऊ असे ते* माझे मित्र मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
2 हे यरूशलेमे, तुझ्या द्वारात आमची पावले लागली आहेत.
स्तोत्रसंहिता धडा 122
3 हे यरूशलेमे, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
4 इस्राएलास लावून दिलेल्या नियमाप्रमाणे, तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश, परमेश्वराच्या नांवाचे उपकारस्मरण करण्यासाठी वर चढून येतात.
5 कारण तेथे न्यायासने, दावीदाच्या घराण्यासाठी राजासने मांडली आहेत.
स्तोत्रसंहिता धडा 122
6 यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करा! तुझ्यावर प्रीती करतात त्यांची भरभराट होईल.
7 तुझ्या कोटात शांती असो, आणि तुझ्या राजवाड्यात उन्नती असो.
8 माझे बंधू आणि माझे सहकारी ह्यांच्याकरता, मी आता म्हणेन, तुमच्यामध्ये शांती असो.
स्तोत्रसंहिता धडा 122
9 परमेश्वर आमचा देव ह्याच्या घराकरता, मी तुझ्या हितासाठी प्रार्थना करीन.