Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 129
स्तोत्रसंहिता धडा 129

सीयोनेच्या शत्रूंचा पाडावा व्हावा म्हणून प्रार्थना 1 इस्राएलाने आता म्हणावे की, माझ्या तरुणपणापासून त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे.

2 त्यांनी माझ्या तरुणपणापासून माझ्यावर हल्ला केला, तरी ते मला पराजित करू शकले नाहीत.

3 नांगरणाऱ्यांनी माझ्या पाठीवर नांगरले; त्यांनी आपली तासे लांब केली.

स्तोत्रसंहिता धडा 129

4 परमेश्वर न्यायी आहे; त्याने दुष्टांच्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत.

5 जे सियोनेचा तिरस्कार करतात, ते सर्व लज्जित होवोत आणि माघारी फिरवले जावोत.

6 ते छपरावरचे गवत वाढण्या आधीच सुकून जाते त्यासारखे होवोत.

7 त्याने कापणी करणारा आपली मूठ भरीत नाही, किंवा पेंढ्या भरणाऱ्याच्या कवेत ते येत नाही.

स्तोत्रसंहिता धडा 129

8 त्यांच्या जवळून येणारे जाणारे म्हणत नाहीत की, “परमेश्वराचा आशीर्वाद तुझ्यावर असो; परमेश्वराच्या नावाने आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो.”