Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 133
स्तोत्रसंहिता धडा 133

बंधूंच्या ऐक्याची धन्यता 1 दाविदाचे स्तोत्र पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.

2 ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.

स्तोत्रसंहिता धडा 133

3 सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.