Marathi बायबल
स्तोत्रसंहिता total 150 अध्याय
स्तोत्रसंहिता
स्तोत्रसंहिता धडा 15
स्तोत्रसंहिता धडा 15
देवाच्या पवित्र डोंगरावरील रहिवासी 1 दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?
2 जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.
3 जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.
स्तोत्रसंहिता धडा 15
4 अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,
5 जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.