Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 23
स्तोत्रसंहिता धडा 23

परमेश्वर माझा मेंढपाळ 1 दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे* यहोवा-रोही , मला कशाचीही उणीव भासणार नाही.

2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.

3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.

स्तोत्रसंहिता धडा 23

4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.

5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.

स्तोत्रसंहिता धडा 23

6 खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.