2 इतिहास धडा 11
18 रहबामने महलथशी विवाहा केला. तिचे वडील यरीमोथ आणि तिची आई अबीहईल. यरीमोथ हा दावीदाचा मुलगा. अबीहईल अलीयाबची मुलगी आणि अलीयाब हा इशायचा मुलगा.
19 महलथापासून रहबामला यऊश, शमऱ्या आणि जाहम हे मुलगे झाले.
20 मग रहबामने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमची नात. माकाला रहबामपासून अबीया, अत्थय, जीजा आणि शलोमीथ ही मुले झाली.
21 रहबामचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमची नात. रहबामला अठरा पत्नी आणि साठ उपपत्नी होत्या. त्याला अठ्ठावीस मुलगे आणि साठ मुली होत्या.
9