2 इतिहास धडा 2
8 लबानोनमधून माझ्यासाठी गंधसरु, देवदार आणि स्वतचंदन यांचे लाकूडही पाठवावे. लबानोनमधले तुझे लाकूडतोड्ये चांगले अनुभवी आहेत हे मला माहीत आहे. त्या तुमच्या सेवकाना माझे सेवक मदत करतील.
9 मी बांधायला घेतलेले मंदिर चांगले विशाल आणि सुंदर होणार असल्यामुळे मला लाकूड मोठ्या प्रमाणावर लागणार आहे.
10 लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईन: 1,25,000 बुशेल गहू, 1,25,000 बुशेल जव, 115,000 गँंलन द्राक्षारस आणि 1,15,000 गँंलन तेल.”
7