Marathi बायबल

निर्गम total 40 अध्याय

निर्गम

निर्गम धडा 3
निर्गम धडा 3

1 मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रो असे होते. मोशे त्याची शेरडेमेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरेब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर ह्या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला.

2 त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते.

निर्गम धडा 3

3 तेव्हा मोशे स्वत:शी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहातो.”

4 मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, “मोशे मोशे!”आणि मोशे म्हणाला, “मी इथे आहे.”

5 तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊनकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस.

निर्गम धडा 3

6 मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.

7 परमेश्वर म्हणाला, “मिसरमध्ये माझ्या लोकांना कसा त्रास भोगावा लागत आहे; आणि मिसरच्या लोकांनी त्याचा कसा छळ चालविलेला आहे, हे मी पाहिले आहे; त्या लोकांच्या हाका मी ऐकल्या आहेत; लोकांचे हाल व दु:ख मला समजले आहे.

निर्गम धडा 3

8 आता मी खाली जाऊन माझ्या लोकांचा मिसरच्या लोकांपासून बचाव करीन; मी त्यांना ह्या देशातून काढून जेथे त्यांना कसलाही त्रास होणार नाही अशा चांगल्या देशातजेथे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी असे विविध प्रकारचे लोक राहतात, तेथे घेऊन जाईन.

9 मी इस्राएल लोकांचे आक्रोश ऐकले आहेत आणि मिसरच्या लोकांनी त्यांचे जीवन कसे कष्टमय व कठीण केले आहे तेही पाहिले आहे.

निर्गम धडा 3

10 तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवीत आहे! तर तू आता त्याच्याकडे जा! आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्राएल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये!”

11 परंतु मोशे देवाला म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही! मी साधा माणूस आहे! तेव्हा फारोकडे जाऊन इस्राएल लोकांना मिसरमधून घेऊन यावयाच्या पात्रतेचा माणूस मी नाही, तर मग मी हे कसे करु शकेन?”

12 देव म्हणाला, “हे तू करु शकशील, कारण मी तुजबरोबर असेन मी तुला पाठवीत आहे याचा पुरावा असा असेल; तू इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणल्यावर या डोंगरावर येऊन माझी उपासना करशील.”

निर्गम धडा 3

13 मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकाकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”

14 मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग.

निर्गम धडा 3

15 देव मोशेला आणखी म्हणाला, याव्हे हा तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे असे तू त्यांना सांग. माझे नांव नेहमीच ‘याव्हे’ असेल. इस्राएल लोक पिढ्यन्पिढ्या मला त्याच नांवाने ओळखतील; ‘त्याच याव्हेने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ असे त्यांना सांग!”

16 आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे.

निर्गम धडा 3

17 आणि मी असे ठरवले आहे की मी तुम्हाला मिसरमध्ये भोगाव्या लागत असलेल्या त्रासापासून सोडवीन व आता कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबुसी अशा वेगवेगव्व्या लोकांच्या ताब्यात असलेल्या देशात घेऊन जाईन. मी तुम्हाला दूधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात नेईन.

18 ते वडीलधारे (पुढारी) तुझे एकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव ‘याव्हे’ आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव ‘याव्हे’ यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’

निर्गम धडा 3

19 “परंतु मला माहीत आहे कि मिसरचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. केवळ महान सामर्थ्यच तुम्हाला जाऊ देण्यास त्याला भाग पाडील;

20 तेव्हा मग मीच माझे महान सामर्थ्य मिसरविरुद्ध वापरीन; मी त्या देशात महान चमत्कार करीन. मग ते केल्यावर तो तुम्हाला जाऊ देईल;

21 आणि मिसरचे लोक तुम्हा इस्राएल लोकांवर दया करतील असे मी करीन. तेव्हा तुम्ही निघताना मिसरचे लोक तुम्हाला पुष्कळ बक्षिसे व भेट वस्तु देतील.

निर्गम धडा 3

22 प्रत्येक इब्री स्त्री म्हणजे इस्राएली स्त्री आपल्या मिसरमधील शेजारणीकडून व आपल्या घरात राहाणाऱ्या मिसरच्या स्त्रीकडून भेट वस्तू मागून घेईल व ते लोक तिला भेट वस्तू देतील; तुम्हा लोकांना सोन्याचांदीचे दागिने व उंची कपडे भेट म्हणून मिळतील. मिसरमधून निघताना त्या वस्तू तुम्ही आपल्या मुलांमुलीच्या अंगावर घालाल. अशा प्रकारे तुम्ही मिसरच्या लोकांची संपत्ती घ्याल.”