Marathi बायबल

यहेज्केल total 48 अध्याय

यहेज्केल

यहेज्केल धडा 6
यहेज्केल धडा 6

1 मग पुन्हा मला परमेश्वराचा संदेश मिळाला.

2 तो म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे वळ. माझ्यातर्फे त्यांच्याविरुद्व बोल.

3 त्या पर्वंतांना पुढील गोष्टी सांग.‘इस्राएलच्या पर्वतांनो, परमेश्वराकडून, माझ्या प्रभूकडून आलेला संदेश ऐका. देव, माझ्या प्रभू, टेकड्या, पर्वत, घळी, दऱ्या या सर्वांना उद्देशून म्हणतो की पाहा! मी (म्हणजेच देव) तुमच्याविरुद्व लढण्यासाठी शत्रूला आणीत आहे. मी तुमच्या उच्चस्थानांचा नाश करीन.

यहेज्केल धडा 6

4 (4-5) तुमच्या वेदींचे तुकडे तुकडे केले जातील, तुमच्या धूप दानांचा ही चुराडा केला जाईल. तुमची प्रेते मी त्या घाणेरड्या मूर्तीपुढे फेकून देईन. मी तुमची हाडे तुमच्या वेदींभोवती पसरवीन. त्या गलिच्छ मूर्तीपुढे मी इस्राएल लोकांची प्रेते टाकीन.

5

6 तुमचे लोक कोठेही राहात असले तरी त्यांचे वाईट होईल. त्यांची शहरे दगडमातीचे ढिगारे होतील. त्यांच्या उच्चस्थानांचा नाश होईल. का? कारण त्यांचा परत कधीही पूजेसाठी उपयोग केला जाऊ नये! त्या सगळ्या वेदींचा नाश केला जाईल. लोक त्या घाणेरड्या मूर्तीची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. लोक त्या घाणेरड्या मूर्तींची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. त्या धूपदानांचे तुकडे तुकडे केले जातील. तुम्ही तयार केलेल्या सर्व गोष्टींचा नाश केला जाईल.

यहेज्केल धडा 6

7 तुमचे लोक मारले जातील. मग तुम्हाला कळेल की मीच परमेश्वर आहे.”

8 देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन.

9 मग ह्या वाचलेल्यालोकांना कैदी म्हणून नेले जाईल. त्यांना सक्तीने दुसऱ्या देशांत राहावे लागेल. पण ते लोक माझे स्मरण ठेवतील. मी त्यांचे ह्दयपरिवर्तन केले. म्हणून त्यांनी केलेल्या दुष्कृत्याबद्दल ते स्वत:चीच घृणा करतील. भूतकाळात, त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली, माझा त्याग गेला. आपल्या नवऱ्यला सोडून दुसऱ्या पुरुषांच्या मागे लागणाऱ्या बाईप्रमाणे, ते त्या गलिच्छ मूर्तींच्या मागे लागले. त्यांनी भयंकर कृत्ये केली.

यहेज्केल धडा 6

10 पण ‘मीच परमेश्वर आहे’ हे त्यांना कळेल. त्यांना हेही कळेल की मी एखादी गोष्ट करायचे ठरविले, की ती करणारच. त्याचे वाईट मीच केले, हे त्यांना समजेल.”

11 नंतर परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “टाळ्या वाजवून आणि तुझे हातपाय आपटून इस्राएलच्या लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांविरुद्ध बोल. ते रोगराईने व उपासमारीने मरतील अशी त्यांना ताकीद दे. ते युद्धात कामी येतील, असे त्यांना सांग.

यहेज्केल धडा 6

12 दूरचे लोक रोगराईने मरतील. ह्या जागेच्या आसपासचे लोक लढाईत मरतील. मगच माझा राग शांत होईल.

13 आणि तेव्हाच तुम्हाला मीच परमेश्वर आहे हे कळेल, जेव्हा तुमची प्रेते, तुमच्या घाणेरड्या मूर्ती आणि तुमच्या वेदी यांच्यापुढे पडतील, तेव्हाच तुम्हाला मी परमेश्वर असल्याचे समजून येईल. उंच टेकड्या, पर्वत, हिरवी झाडे, दाट पालवीची एलाची झाडे अशा ठिकाणी म्हणजेच तुमच्या पूजेच्या प्रत्येक ठिकाणी प्रेते पडतील. ह्या सर्व ठिकाणी तुम्ही बळी अर्पण केले आणि घाणेरड्या मूर्तींपुढे सुवासिक धूप जाळला.

यहेज्केल धडा 6

14 पण मी माझा हात उगारीन व तुला आणि तुझ्या लोकांना शिक्षा करीन. मी मग ते लोक कुठेंही राहात असोत, ह्या देशांचा नाश करीन. तो मग दिबला वाळवंटा पेक्षा ओसाड होईल. तेव्हाच त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळून येईल.”