Marathi बायबल

स्तोत्रसंहिता total 150 अध्याय

स्तोत्रसंहिता

स्तोत्रसंहिता धडा 118
स्तोत्रसंहिता धडा 118

1 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा. त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.

2 इस्राएल, म्हण “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

3 याजकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

4 परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

5 मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.

स्तोत्रसंहिता धडा 118

6 परमेश्वर माझ्या बरोबर आहे म्हणून मी घाबरणार नाही. लोक मला त्रास देण्यासाठी काहीही करु शकणार नाहीत.

7 परमेश्वर मला मदत करणारा आहे. माझ्या शत्रूंचा पराभव झालेला मी बघेन.

8 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

9 परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.

स्तोत्रसंहिता धडा 118

10 बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

11 शत्रूंनी मला पुन्हा पुन्हा घेरले, मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

12 शत्रूंनी मला मधमाशांच्या थव्याप्रमाणे घेरले होते. परंतु त्यांचा पटकन् जळून जाणाऱ्या झुडपाप्रमाणे लवकरच नाश झाला. मी त्यांचा परमेश्वराच्या शक्तीने पराभव केला.

स्तोत्रसंहिता धडा 118

13 माझ्या शत्रूने माझ्यावर हल्ला केला आणि माझा जवळ जवळ सर्वनाश केला परंतु परमेश्वराने मला मदत केली.

14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे. परमेश्वर मला वाचवतो.

15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.

16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

स्तोत्रसंहिता धडा 118

17 मी जगेन आणि मरणार नाही आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.

18 परमेश्वराने मला शिक्षा केली परंतु त्याने मला मरु दिले नाही.

19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा. मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.

20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.

21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

स्तोत्रसंहिता धडा 118

22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला.

23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.

24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.

25 लोक म्हणाले, “परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने आपला उध्दार केला.

26 परमेश्वराचे नाव घेऊन येणाऱ्या माणसाचे स्वागत करा. “याजकांनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या घरी आम्ही तुझे स्वागत करतो.”

स्तोत्रसंहिता धडा 118

27 परमेश्वर देव आहे आणि तो आपला स्वीकार करतो. बळी देण्यासाठी कोकराला बांधून ठेवा आणि त्याला वेदीच्या कोपऱ्यावर न्या.

28 परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो.

29 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.