Marathi बायबल

प्रकटीकरण total 22 अध्याय

प्रकटीकरण

प्रकटीकरण धडा 8
प्रकटीकरण धडा 8

1 कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला. तेव्हा स्वर्गात अर्धा तासपर्यंत सर्वत्र शांतता होती.

2 आणि मी सात देवदूतांनादेवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.

3 दुसरा देवदूत आला आणि वेदीजवळ उभा राहिला. या देवदूताकडे सोनेरी धूप ठेवण्याचे भांडे होते, त्यांच्याकडे धूपप्रार्थनेसह अर्पण करण्यासाठी दिले होते. ह्या प्रार्थना देवाच्या पवित्र पवित्र लोकांच्या होत्या. देवदूताने त्याचे अर्पणसिंहासनासमोर सोनेरी वेदीवर ठेवले.

प्रकटीकरण धडा 8

4 धुपाचा धूर देवदूताच्या हातातून देवाच्या सिंहासनासमोर गेला. धूर देवाच्या लोकांच्याप्रार्थनेसह गेला.

5 मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकूलागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.

6 मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.

7 पहिल्या देवदूताने कर्णा वाजविला आणि रक्तमिश्रित गारा वअग्नि पृथ्वीवर टाकण्यात आले. तेव्हा पृथ्वीचा एक तृतीयांश भाग आणि एक तृतीयांश झाडे व सर्व हिरवे गवत जळून गेले.

प्रकटीकरण धडा 8

8 दुसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा अग्नीने जळत असलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले.आणि एक तृतीयांश समुद्राचे रक्त झाले.

9 आणि एक तृतीयांश समुद्रातील जीव मेले. आणि एक तृतीयांश जहाजे नष्ट झाली.

10 तिसऱ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला तेव्हा एक मोठा तारा मशालीप्रमाणे पेटलेला आकाशातून पडला. तो तारानद्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला आणि झऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर पडला.

प्रकटीकरण धडा 8

11 त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणिएक तृतीयांश पाणी कडू झाले. ते कडू असलेले पाणी पिऊन पुष्कळ लोक मेले.

12 चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांशभागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एकतृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.

प्रकटीकरण धडा 8

13 मी पाहत असताना, आकाशात उंचावर मी गरुडाला उडताना पाहिले. गरुड मोठ्या आवाजात म्हणाला, “संकट! संकट!संकट, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर संकट येत आहे. हे संकट तीन देवदूतांनी कर्णा वाजविल्यावर येईल.”