मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
गणना
1. मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले:
2. “जर एखाद्याला देवाला काही खास वचन द्यायचे असेल किंवा त्याने देवाला खास वस्तू द्यायचे वचन दिले असेल तर त्याला ती गोष्ट करु द्या. पण त्या माणसाने जे वचन दिले असेल तेच नेमके केले पाहिजे.
3. “एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल.
4. जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
5. पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. तिने जे वचन दिले ते तिला पूर्ण करावे लागणार नाही.
6. “तिला तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील.
7. तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या रत्रीने पचनाची पूर्तता केली पाहिजे.
8. पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाही तर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले-तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही-म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील.
9. “विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे.
10. लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल.
11. तिच्या नवऱ्याने त्यावचनाबद्दल ऐकले आणि त्याची पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिने त्याप्रमाणे केले पाहिजे.
12. पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाही तर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील.
13. लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल.
14. नवरा यापैकी कुठल्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कुठल्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो.
15. पण जर नवऱ्याने वचनांबद्दल ऐकले आणि त्यांच्यावर त्याने बंदी आणली तर तिने दिलेले वचन मोडण्याला तो जबाबदार असेल.”
16. परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. या एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.
Total 36 अध्याय, Selected धडा 30 / 36
1 मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले: 2 “जर एखाद्याला देवाला काही खास वचन द्यायचे असेल किंवा त्याने देवाला खास वस्तू द्यायचे वचन दिले असेल तर त्याला ती गोष्ट करु द्या. पण त्या माणसाने जे वचन दिले असेल तेच नेमके केले पाहिजे. 3 “एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात रहात असेल आणि तिने परमेश्वराला खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल. 4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. तिने जे वचन दिले ते तिला पूर्ण करावे लागणार नाही. 6 “तिला तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील. 7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या रत्रीने पचनाची पूर्तता केली पाहिजे. 8 पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाही तर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले-तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही-म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. 9 “विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वराला वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 10 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल. 11 तिच्या नवऱ्याने त्यावचनाबद्दल ऐकले आणि त्याची पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिने त्याप्रमाणे केले पाहिजे. 12 पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाही तर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्याला महत्व नाही. तिचा नवरा वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील. 13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वराला काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल. 14 नवरा यापैकी कुठल्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कुठल्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो. 15 पण जर नवऱ्याने वचनांबद्दल ऐकले आणि त्यांच्यावर त्याने बंदी आणली तर तिने दिलेले वचन मोडण्याला तो जबाबदार असेल.” 16 परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. या एक पुरुष आणि त्याची बायको यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.
Total 36 अध्याय, Selected धडा 30 / 36
×

Alert

×

Marathi Letters Keypad References