मराठी बायबल

ऐसी तो रीड वर्शन (ESV)
स्तोत्रसंहिता
1. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
2. त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
3. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे.
4. परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे.
5. परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
6. परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.
7. देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
8. देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
9. देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
10. देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले.
11. देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
12. आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.
13. परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
14. परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
15. दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
16. त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
17. पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
18. आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.
19. इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
20. लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
21. परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 135 / 150
1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा. 2 त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा. 3 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे. 4 परमेश्वराने याकोबला निवडले. इस्राएल देवाचा आहे. 5 परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे. 6 परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो. 7 देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो. विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो. 8 देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले. 9 देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या. 10 देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला. देवाने शक्तिशाली राजांना मारले. 11 देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला. देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला. देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला. 12 आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली. देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली. 13 परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील. परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल. 14 परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता. 15 दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते. त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते. 16 त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते. 17 पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते. 18 आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील. का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता. 19 इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. 20 लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा. 21 परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 135 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References