मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
गीतरत्न
1. राजाकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कलाकाराने केलेल्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.
2. तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.
3. तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.
4. तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे.
5. तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.
6. तू किती सुंदर आहेस! किती आल्हाददायक आहेस! सुंदर, आनंद देणारी तरुण स्त्री!
7. तू उंच आहेस, नारळाच्या झाडासारखी उंच आहेस. आणि तुझे वक्ष त्या झाडावर लागलेल्या फळांच्या घोसासारखे आहेत.
8. मला त्या झाडावर चढून त्याच्या फांद्यांना धरायला आवडेल. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.
9. तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या, झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे.
10. मी माझ्या प्रियकराची आहे आणि मी त्याला हवी आहे.
11. प्रियकरा, ये आपण शोतावर जाऊ. आपण खेेड्यात रात्र घालवू.
12. आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळींब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.
13. पुत्रदात्रीचा वास घे आणि आपल्या दाराजवळ असलेल्या इतर सुंदर फुलांचाही वास घे. होय, प्रियकरा, मी तुझ्यासाठी अनेक चांगल्या आनंददायी नव्या आणि जुन्या, गोष्टी राखून ठेवल्या आहेत.
Total 8 अध्याय, Selected धडा 7 / 8
1 2 3 4 5 6 7 8
1 राजाकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कलाकाराने केलेल्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे. 2 तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे. 3 तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत. 4 तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे. 5 तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात. 6 तू किती सुंदर आहेस! किती आल्हाददायक आहेस! सुंदर, आनंद देणारी तरुण स्त्री! 7 तू उंच आहेस, नारळाच्या झाडासारखी उंच आहेस. आणि तुझे वक्ष त्या झाडावर लागलेल्या फळांच्या घोसासारखे आहेत. 8 मला त्या झाडावर चढून त्याच्या फांद्यांना धरायला आवडेल. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे. 9 तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या, झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे. 10 मी माझ्या प्रियकराची आहे आणि मी त्याला हवी आहे. 11 प्रियकरा, ये आपण शोतावर जाऊ. आपण खेेड्यात रात्र घालवू. 12 आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळींब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन. 13 पुत्रदात्रीचा वास घे आणि आपल्या दाराजवळ असलेल्या इतर सुंदर फुलांचाही वास घे. होय, प्रियकरा, मी तुझ्यासाठी अनेक चांगल्या आनंददायी नव्या आणि जुन्या, गोष्टी राखून ठेवल्या आहेत.
Total 8 अध्याय, Selected धडा 7 / 8
1 2 3 4 5 6 7 8
×

Alert

×

Marathi Letters Keypad References