मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
शास्ते
1. एक दिवस शमशोन गज्जा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली.
2. कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु”
3. पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीपर्यंतच राहिला. अर्ध्या रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळखिळे केले. ते दरवाजे, त्यांच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटून काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला.
4. पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरेक खोऱ्यातील होती. शमशोन आणि दलीला
5. पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”
6. मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?”
7. शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”
8. तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले.
9. शेजारच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळलेल्या सुतळीची राख पडावी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ट्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही.
10. तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”
11. शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.”
12. तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्यानेे म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले.
13. यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावळट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”शमशोनने सांगितले, “माझ्या केसांचे सात पेड करुन ते मागाच्या ताण्यावर करकचून आवळले तरच ते शक्या आहे.”शमशोनला झोप लागल्यावर दलीलाने हातमाग वापरुन त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने.
14. तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पक्कारोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुझा ताबा घ्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, माग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले.
15. तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.”
16. तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले.
17. शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.”
18. आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मलानक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले.
19. आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली.
20. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती.
21. मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले.
22. परंतु शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले.
23. पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती.
24. शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले.“याने आमच्या देशाचा नाश केला आमची पुष्कळ माणसे मारली परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.”
25. उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते.
26. एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”शमशोन आणि दलीला
27. देवळात बायका-पुरुष सगव्व्यांची एतच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते.
28. तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.”
29. एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने घरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला.
30. “या पलिष्टड्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली.
31. शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
Total 21 अध्याय, Selected धडा 16 / 21
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
1 एक दिवस शमशोन गज्जा या नगरात गेला. तेथे त्याने एका वेश्येला पाहिले. ती रात्र त्याने तिच्याकडे घालवली. 2 कोणीतरी हे पाहून शमशोन आला असल्याचे गज्जाच्या लोकांना सांगितले. तेव्हा ते त्याला मारायला निघाले. त्या ठिकाणाला वेढा घालून ते शमशोनची वाट पाहात दबा धरुन बसले. शहराच्या वेशीपाशी त्यांनी पूर्ण रात्र काढली गप्प राहून रात्र भर त्यांनी आपला सुगावा लागू दिला नाही. ते एकमेकांना म्हणाले, “उजाडताच आपण त्याला मारु” 3 पण शमशोन त्या वेश्येकडे मध्यरात्रीपर्यंतच राहिला. अर्ध्या रात्रीच तो उठला. वेशीचे दरवाजे त्याने खिळखिळे केले. ते दरवाजे, त्यांच्या चौकटी आणि अडसर हे सगळे त्याने उचकटून काढले, खांद्यावर टाकले आणि हे सगळे घेऊन तो हेब्रोन जवळच्या डोंगरमाथ्यावर गेला. 4 पुढे शमशोन दलीला नामक स्त्रीच्या प्रेमात पडला. ती सोरेक खोऱ्यातील होती. शमशोन आणि दलीला 5 पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.” 6 मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?” 7 शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.” 8 तेव्हा पलिष्टी अधिकाऱ्यांनी दलीलाला सात नव्या प्रत्यंचा आणून दिल्या. त्या अजून पुरत्या वाळल्या देखील नव्हत्या. दलीलाने त्यांनी शमशोनला जखडून टाकले. 9 शेजारच्या खोलीत काही माणसे लपून बसली होती. दलीला शमशोनला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक आता तुला ताब्यात घेणार आहेत.” पण शमशोनने त्या प्रत्यंचा सहजगत्या तोडून टाकल्या जळलेल्या सुतळीची राख पडावी इतक्या सहजपणे त्या गळून पडल्या. अशाप्रकारे पलिष्ट्यांना काही शमशोनच्या सामर्थ्याचे रहस्य समजले नाही. 10 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?” 11 शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.” 12 तेव्हा दलीलाने नवेकोरे दोरखंड आणून त्याला बांधले. दुसऱ्या खोलीत काही जण लपलेले होतेच. दलीला मोठ्यानेे म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला पकडायला आले आहेत!” पण याही वेळी शमशोनने ते दोरखंड सुतळीसारखे तटकन तोडून टाकले. 13 यावर ती त्याला म्हणाली, “बघ, पुन्हा तू खोटे बोललास! मला बावळट ठरवलेस. आता तरी सांग तुला जखडून टाकायची युक्ती.”शमशोनने सांगितले, “माझ्या केसांचे सात पेड करुन ते मागाच्या ताण्यावर करकचून आवळले तरच ते शक्या आहे.”शमशोनला झोप लागल्यावर दलीलाने हातमाग वापरुन त्याच्या डोक्यावरील सात पेड विणून तिने. 14 तंबूची खुंटी ठोकून माग जमिनीवर पक्कारोवला. मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुझा ताबा घ्यायला सज्ज आहेत.” त्यावर शमशोनने खुंटी, माग हे सगळे सहजगत्या उपटून टाकले. 15 तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “माझ्यावर तुझे प्रेम आहे असे म्हणतोस आणि एवढाही विश्वास टाकत नाहीस ना? आपले गुपित तू फोडायला तयार नाहीस. माझी फजिती करायची ही तुझी तिसरी वेळ तुझ्या प्रचंड सामर्थ्याचे गुपित तू अजूनही मला सांगितलेले नाहीस.” 16 तिने मग त्याच्या मागे लकडाच लावला. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे मरण बरे असे त्याला वाटू लागले. 17 शेवटी त्याने तिला सर्व काही सांगून टाकले. तो म्हणाला, “आजतागायत कधीही माझे केस कापलेले नाहीत. माझ्या जन्माआधीच मला परमेश्वराला वाहिलेले आहे. तेव्हा आता माझे मुंडन केले तर माझा शक्तिपात होईल व मी चार चौघांसारखा सामान्य होईन.” 18 आता त्याने खरंच आपले मन मोकळे केले आहे हे दलीलाच्या लक्षात आले. म्हणून पलिष्टी अधिकाऱ्यांना तिने निरोप पाठवला, “आता शमशोनने आपले रहस्य मलानक्की सांगितले आहे.” तेव्हा ते आले. येताना तिला वचन केलेले पैसेही घेऊन आले. 19 आपल्या मांडीवर पडल्या पडल्या शमशोनला झोप लागली आहे याची खात्री पटल्यावर तिने एकाला बोलावले. त्याच्या कडून शमशोनच्या डोक्यावरील सात बटांचे तिने मुंडन करवले. अशारितीने तिने त्याला अगदी हतबल करुन टाकले. शमशोन गलितगात्र आणि पराभवास योग्य झाला. त्याची शक्ती त्याला सोडून गेली. 20 मग ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी लोक तुला जेरबंद करायला आले आहेत.” तेव्हा तो जागा झाला. त्याला वाटले, “पूर्वीप्रमाणेच याही वेळी मी माझी सुटका करुन घेऊ शकेन.” पण परमेश्वर आपल्याला सोडून गेला आहे याची त्याला कल्पना नव्हती. 21 मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले. 22 परंतु शमशोनचे केस पुन्हा वाढू लागले. 23 पलिष्ट्यांचे अधिकारी मोठा आनंदोत्सव साजरा करायला एकदा एकत्र जमले. आपला देव दागोन याच्या प्रीत्यर्थ ते मोठा यज्ञ करणार होते. कारण त्यांना वाटत होते की शमशोन या शत्रूचा पाडाव करायला त्यांच्या ह्या दैवताने त्यांना मदत केली होती. 24 शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले.“याने आमच्या देशाचा नाश केला आमची पुष्कळ माणसे मारली परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.” 25 उत्सवाच्या ठिकाणी मौजमजा करण्यात लोक दंग होते. ते म्हणाले, “शमशोनला समोर आणा. त्याची थोडी चेष्टा करु.” तेव्हा शमशोनला तुरुंगातून बाहेर काढले आणि लोक आपली करमणूक करुन घेऊ लागले. देवळातील खांबांमध्ये त्यांनी त्याला उभे केले होते. 26 एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.”शमशोन आणि दलीला 27 देवळात बायका-पुरुष सगव्व्यांची एतच गर्दी उसळली होती. पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथे हजर होते. शिवाय छपरावर तीन एक हजार माणसे होती. सर्वजण शमशोनची गंमत पाहण्यात दंग होते. 28 तेव्हा शमशोनने देवाचा धावा केला. तो म्हणाला, “हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझी आठवण कर एकदा, फक्त एकदाच माझी शक्ती मला परत दे. माझे डोळे फोडल्याबद्दल शिक्षा म्हणून एकदाच या पलिष्ट्यांना मला धडा शिकवू दे.” 29 एवढे म्हणून देवळाच्या मधोमध असलेले ते दोन खांब शमशोनने घरले. पूर्ण देवळाचा डोलारा या दोन स्तंभांवर उभा होता. आपल्या सर्व शक्तीनिशी त्या स्तंभांना त्याने जोराचा रेटा दिला. 30 “या पलिष्टड्यांच्या बरोबरच माझीही अखेर होईल.” एवढे म्हणून त्याने जबरदस्त ताकद लावली. त्याबरोबर पूर्ण देऊळ जमीनदोस्त झाले. अधिकाऱ्यांसह सर्व माणसे त्याखाली सापडली. जिवंतपणी मारली त्यापेक्षा कितीतरीपट माणसे शमशोनने अशाप्रकारे मरता मरता मारली. 31 शमशोनचे भाऊ बंद आणि घरातील सर्व परिवार तेथे जमा झाला. त्याचा मृतदेह त्यांनी घेतला आणि त्याच्या वडीलांच्या कबरीतच त्याचाही अंत्यसंस्कार केला. सरा आणि अष्टावोल यांच्या दरम्यान हे कबरस्थान आहे. शमशोनाने वीस वर्षे इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
Total 21 अध्याय, Selected धडा 16 / 21
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
×

Alert

×

Marathi Letters Keypad References