मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यहेज्केल
1. मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते.
2. मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या नगरीत दुष्ट बेत करणारे लोक हेच होत. हे लोक इतर लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात.
3. ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’
4. ते खोटे बोलत आहेत. म्हणून तू माझ्यावतीने लोकांशी बोल. “मानवपुत्रा, लोकांना संदेश सांग.”
5. मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो.
6. ह्या नगरीत तुम्ही पुष्कळांना ठार केले, रस्ते प्रेतांनी झाकून टाकले.
7. आता परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘ती प्रेते म्हणजे मांस व नगरी म्हणजे भांडे आहे. तो (नबुखद्नेस्सर) येईल आणि ह्या सुरक्षित भांड्यातून तुम्हाला बाहेर काढील.
8. तुम्ही तलवारीला घाबरता. पण मी तलवारीलाच तुमच्यावर आणीत आहे.” परमेश्वराने, आमच्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. मग त्या घडतीलच.
9. देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन.
10. तुम्ही तलवारीने मराल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. म्हणजे तुम्हाला कळेल की शिक्षा करणारा मीच एक आहे. मीच परमेश्वर आहे.
11. हो! ही जागा म्हणजे अन्न शिजविण्याचे भांडे होईल. त्यातील मांस तुम्ही असाल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन.
12. मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.”
13. मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!”
14. पण मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला,
15. “मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’
16. “म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन.”
17. म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन.
18. आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील.
19. “ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे, मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे ह्दय काढून घेऊन तिथे मी खरे ह्दय बसवीन.
20. मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो, त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन.”‘
21. मग देव पुढे म्हणाला, “पण सध्या, त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,
22. ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.
23. परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवरथांबली.
24. मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले.
25. मी परागंदा झालेल्या लोकांशी बोललो. परमेश्वराने मला दाखाविलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना संगितल्या.
Total 48 अध्याय, Selected धडा 11 / 48
1 मग वाऱ्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्व-द्वाराजवळ नेले. ह्या दाराचे तोंड उगवतीला होते. त्या प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मी पंचवीस लोकांना पाहिले. त्यांत अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलट्या हेही होते. हे लोकांचे नेते होते. 2 मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या नगरीत दुष्ट बेत करणारे लोक हेच होत. हे लोक इतर लोकांना वाईट गोष्टी करायला सांगतात. 3 ते म्हणतात, ‘आपण आपली घरे पुन्हा लवकरच बांधू. भांड्यातील मांसाप्रमाणे आपण येथे सुरक्षित आहोत.’ 4 ते खोटे बोलत आहेत. म्हणून तू माझ्यावतीने लोकांशी बोल. “मानवपुत्रा, लोकांना संदेश सांग.” 5 मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो. 6 ह्या नगरीत तुम्ही पुष्कळांना ठार केले, रस्ते प्रेतांनी झाकून टाकले. 7 आता परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘ती प्रेते म्हणजे मांस व नगरी म्हणजे भांडे आहे. तो (नबुखद्नेस्सर) येईल आणि ह्या सुरक्षित भांड्यातून तुम्हाला बाहेर काढील. 8 तुम्ही तलवारीला घाबरता. पण मी तलवारीलाच तुमच्यावर आणीत आहे.” परमेश्वराने, आमच्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. मग त्या घडतीलच. 9 देव असेही म्हणाला, “मी तुम्हा लोकांना या नगरीतून बाहेर काढीन, व परक्यांच्या हाती देईन. मी तुम्हाला शिक्षा करीन. 10 तुम्ही तलवारीने मराल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. म्हणजे तुम्हाला कळेल की शिक्षा करणारा मीच एक आहे. मीच परमेश्वर आहे. 11 हो! ही जागा म्हणजे अन्न शिजविण्याचे भांडे होईल. त्यातील मांस तुम्ही असाल. मी तुम्हाला इस्राएलमध्येच शिक्षा करीन. 12 मगच तुम्हाला ‘मी परमेश्वर आहे’ हे कळेल. तुम्ही मोडलात तो माझा कायदा होता. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या राष्ट्राप्रमाणे जगण्याचे ठरविले.” 13 मी भविष्यावाणी संपवताच बनायाचा मुलगा पलट्या मेला. मी जमिनीवर पडलो. डोके टेकवून मी मोठ्याने ओरडलो, “हे परमेश्वरा, माझ्या प्रभु, तू इस्राएलच्या अवशेषाचा पूर्ण विध्वंस करणार आहेस!” 14 पण मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, 15 “मानवपुत्रा, हा देश ज्यांना सक्तीने सोडावा लागला त्या इस्राएलच्या कुटुंबीयांचे, तुझ्या भाऊबंदाचे स्मरण कर. ते येथून दूर असलेल्या देशात राहतात. पण मी त्यांना परत आणीन. पण यरुशलेममध्ये राहणारे लोक म्हणतात, ‘परमेश्वरापासून दूर राहा ही भूमी आम्हाला दिलेली आहे ती आमची आहे.’ 16 “म्हणून त्या लोकांना पुढील गोष्टी सांग; परमेश्वर, आमचा प्रभू, म्हणतो, ‘मी माझ्या लोकांना दूरच्या देशांत सक्तीने घालविले, हे खरे आहे. मी त्यांना पुष्कळ देशांत विखुरले, त्या देशांतील मुक्कामाच्या अल्पकाळात मीच त्यांचे मंदिर होईन.” 17 म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन. 18 आणि जेव्हा माझे लोक परत येतील, तेव्हा ते इथे असलेल्या त्या सर्व भयंकर घाणेरड्या मूर्तीचा नाश करतील. 19 “ते सर्वजण एकच व्यक्ती असल्याप्रमाणे, मी त्यांच्यात ऐक्य निर्माण करीन. मी त्यांच्यात नवीन आत्मा ओतीन. त्यांचे दगडाचे ह्दय काढून घेऊन तिथे मी खरे ह्दय बसवीन. 20 मग ते माझे नियम पाळतील, माझ्या आज्ञांचे पालन करतील. मी सांगतो, त्याच गोष्टी ते करतील. ते खऱ्या अर्थाने माझी माणसे होतील व मी त्यांचा देव होईन.”‘ 21 मग देव पुढे म्हणाला, “पण सध्या, त्यांचे मन त्या भयानक, गलिच्छ मूर्तींचेच झाले आहे. त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा केलीच पाहिजे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला, 22 ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती. 23 परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवरथांबली. 24 मग वाऱ्याने मला उचलून परत बाबेलला खास्द्यांच्या देशात आणले. इस्राएलच्या ज्या लोकांना बळजबीने इस्राएल सोडावे लागले होते, त्यांच्यात त्याने मला आणले, मग, दुष्टान्तामध्येच, देवाच्या चैतन्याने मला सोडले व ते हवेत उंच गेले. मी हे सर्व दृष्टान्तात पाहिले. 25 मी परागंदा झालेल्या लोकांशी बोललो. परमेश्वराने मला दाखाविलेल्या सर्व गोष्टी मी त्यांना संगितल्या.
Total 48 अध्याय, Selected धडा 11 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References