मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यहेज्केल
1. “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.1 2मैल) लांबीची व 20000 हात (8.12मैल) लांबीची व 20000 हात (6.6मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल.
2. जमिनीचा 500 हाताचा (875फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87फूट 6इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.
3. पवित्र प्रदेश 2505000 हात (8.3मैल) लाब व 10000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.
4. परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल.
5. जमिनीचा 25000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
6. “गावासाठी तुम्ही 5000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल.
7. पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल.
8. ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”
9. परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
10. “लोकांना फसवू नका. योग्य वजन - मापे वापरा.
11. एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत.
12. शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25शेकेल, 15शेकेल एवढा असला पाहिजे.
13. “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ (
14. वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14वाडगे) जव. 14प्रत्येक कोर (55गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 110 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल. लक्षात ठेवा. 10 बाथचा एक होमर होतो10 बाथचा एक कोर होतो
15. आणि इस्राएलच्या चांगल्यातल्या चांगल्या कुरणातील 200 मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढरु द्यावे.“ही खास अर्पणे धान्यार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे यासाठी आहेत. ह्यामुळे लोकांची शुद्धता होते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
16. “ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील.
17. पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”
18. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा.
19. याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील.
20. कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल.
21. “पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण साजरा केला पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण ह्यावेळेसच सुरु होतो. तो सात दिवस चालतो.
22. त्या वेळी, राजा स्वत:करिता आणि इस्राएलच्या लोकांकरिता पापार्पण म्हणून बैल देईल.
23. सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल.
24. राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (1/2 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (1/2 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे.
25. मंडपाच्या सणाच्या सात दिवसात राजाने असेच सर्व अर्पण करावे. हा सण सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. त्या वेळची पापार्पण, होमार्पण, धान्यार्पण आणि तेलार्पण ही अर्पणे असतील.”
Total 48 अध्याय, Selected धडा 45 / 48
1 “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25000 हात (8.1 2मैल) लांबीची व 20000 हात (8.12मैल) लांबीची व 20000 हात (6.6मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल. 2 जमिनीचा 500 हाताचा (875फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87फूट 6इंच) रुंदीची मोकळी जागा असेल. 3 पवित्र प्रदेश 2505000 हात (8.3मैल) लाब व 10000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल. 4 परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल. 5 जमिनीचा 25000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील. 6 “गावासाठी तुम्ही 5000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल. 7 पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल. 8 ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.” 9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 10 “लोकांना फसवू नका. योग्य वजन - मापे वापरा. 11 एफा (कोरडे पदार्थ मोजण्याचे माप) बाथ (द्रव पदार्थ मोजण्याचे माप) सारख्याच आकाराचे असू द्या. ही मापे होमरच्या परिमाणात असली पाहिजेत. म्हणजे एफ व बाथ 1/10 होमर इतक्या मापाची असावीत. 12 शेकेल 20 गेरा एवढा असला पाहिजे. मीना हा 60 शेकेल म्हणजेच 20 शेकेल, 25शेकेल, 15शेकेल एवढा असला पाहिजे. 13 “पुढील गोष्टी तुम्ही अर्पण केल्याच पाहिजेत.प्रत्येक होमर (6 बुशल) गव्हासाठी 1/6 एफ ( 14 वाडगे) गडू. प्रत्येक होमर (6 बुशल) जवासाठी 1/6 एफ (14वाडगे) जव. 14प्रत्येक कोर (55गॅलन) ऑलिव्ह तेलासाठी 110 बाथ (1/2 गॅलन) ऑलिव्ह तेल. लक्षात ठेवा. 10 बाथचा एक होमर होतो10 बाथचा एक कोर होतो 15 आणि इस्राएलच्या चांगल्यातल्या चांगल्या कुरणातील 200 मेंढ्यांच्या कळपातील एक मेंढरु द्यावे.“ही खास अर्पणे धान्यार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे यासाठी आहेत. ह्यामुळे लोकांची शुद्धता होते.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 16 “ह्या देशातील, प्रत्येकजण, राजाकरिता, या गोष्टी अर्पण करील. 17 पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.” 18 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा. 19 याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील. 20 कोणाही माणसाच्या हातून नकळत वा माहीत नसल्याने पाप घडले असेल म्हणून महिन्याच्या सातव्या दिवशी तुम्ही मघाशी सांगितले तसे करावे. म्हणजे मंदिर शुद्ध होईल. 21 “पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्ही वल्हांडणाचा सण साजरा केला पाहिजे. बेखमीर भाकरीचा सण ह्यावेळेसच सुरु होतो. तो सात दिवस चालतो. 22 त्या वेळी, राजा स्वत:करिता आणि इस्राएलच्या लोकांकरिता पापार्पण म्हणून बैल देईल. 23 सणाच्या सात दिवसात राजा सात निर्दोष बैल व सात निर्दोष मेंढे ह्यांचे देवाला हवन करील. राजा प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे सात बैल अर्पण करील. तसेच पापार्पण म्हणून रोज एक बोकड देईल. 24 राजा प्रत्येक बैलाबरोबर एक एफ (12 बुशेल) जव धान्यार्पण म्हणून देईल. प्रत्येक मेंढ्याबरोबर पण तो एक एफ (12 बुशेल) जव देईल. प्रत्येक एफ धान्याबरोबर राजाने एक हीन (1 गॅलन) तेल दिलेच पाहिजे. 25 मंडपाच्या सणाच्या सात दिवसात राजाने असेच सर्व अर्पण करावे. हा सण सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. त्या वेळची पापार्पण, होमार्पण, धान्यार्पण आणि तेलार्पण ही अर्पणे असतील.”
Total 48 अध्याय, Selected धडा 45 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References