मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
इब्री लोकांस
1. कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही.
2. जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते.
3. पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात.
4. कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही.
5. म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले.
6. होमार्पणांनी व पापार्पणांनी तुला आनंद वाटला नाही.
7. मग मी म्हणालो, ‘हा मी आहे! नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’” स्तोत्र. 40:6-8
8. पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.)
9. मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली.
10. देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो.
11. प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.
12. परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
13. आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे.
14. कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले.
15. पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो,
16. “त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात ठेवीत आणि ते त्यांच्या मनावर लिहीन. यिर्मया 31:33
17. मग तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” यिर्मया 31:34
18. जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्याकता भासणार नाही.
19. म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.
20. त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्रस्तथानात पाऊल ठेवू शकतो.
21. आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे.
22. म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ.
23. आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे.
24. आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
25. आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवसजवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे.
26. सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही.
27. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.
28. जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात.
29. तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
30. कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.”पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”
31. जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्टी आहे.
32. ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली.
33. काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले.
34. एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
35. म्हणून तुमच्यामध्ये जो टृढ विश्वास होता तो सोडू नका. कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे.
36. तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळावे.
37. आता अगदी थोडक्या अवधीनंतर,“जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
38. परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” हबक्कू 2:3-4
39. पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.
Total 13 अध्याय, Selected धडा 10 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
1 कारण नियमशास्त्र हे भविष्यकाळात येणाऱ्या चांगल्या गोष्टींची केवळ एक छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरुप नव्हे, म्हणून देवाची उपासना करण्यासाठी जे त्याच्याजवळ येतात त्यांना नियमशास्त्र त्याच अर्पणांमुळे जी वर्षानुवर्षे पुन्हा पुन्हा केली जातात, ते कदापि परिपूर्ण करू शकत नाही. 2 जर नियमशास्त्र लोकांना परिपूर्ण करू शकले असते तर यज्ञ अर्पण करण्याचे थांबले नसते का? कारण उपासना करणारे, कायमचेच शुद्ध झाले असते आणि त्यानंतर आपल्या पापांच्या बाबतीत दोषी ठरले नसते. 3 पण त्याऐवजी ते यज्ञ दरवर्षी पापांची आठवण करून देतात. 4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे शक्य नाही. 5 म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो म्हणाला, “तुला यज्ञ किंवा अर्पणे नको होती, पण तू माझ्यासाठी शरीर तयार केले. 6 होमार्पणांनी व पापार्पणांनी तुला आनंद वाटला नाही. 7 मग मी म्हणालो, ‘हा मी आहे! नियमशास्त्राच्या गुंडाळ्यामध्ये माझ्याबद्दल लिहून ठेवले आहे, देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.’” स्तोत्र. 40:6-8 8 पहिल्याने तो म्हणाला, “तुला यज्ञांनी, अर्पणांनी, होमार्पणांनी व पापार्पणांनी संतोष वाटत नाही.” (जरी नियमशास्त्रानुसार ही अर्पणे आवश्यक ठरतात रतीदेखील.) 9 मग तो म्हणाला, “हा मी आहे! तुझी इच्छा पूर्ण करण्यास मी आलो आहे.” अशा रीतीने त्याने दुसरी व्यवस्था करण्यासाठी पहिली रद्द केली. 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो. 11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो. 12 परंतु आपल्या पापांसाठी येशूने त्याच्या देहाचे एकमेव अर्पण केले. कारण ते सर्वकाळासाठी चांगले होते. तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे. 13 आणि आता त्याच्या शत्रूला त्याच्या पायाखाली घालीपर्यंत तो वाट पाहत आहे. 14 कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले. 15 पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो, 16 “त्या दिवसानंतर मी त्यांच्याशी हा करार करीन, असे प्रभु म्हणतो, मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात ठेवीत आणि ते त्यांच्या मनावर लिहीन. यिर्मया 31:33 17 मग तो म्हणतो, आणि मी त्यांची पापे व नियमविरहित कृत्ये कधीही आठवणार नाही.” यिर्मया 31:34 18 जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाच्या आणखी अर्पणाची आवश्याकता भासणार नाही. 19 म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो. 20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्रस्तथानात पाऊल ठेवू शकतो. 21 आणि देवाच्या घराण्यावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. 22 म्हणून आपण आपली मळीन विवेकबद्धि शुद्ध करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने आपण विश्वास, आश्वासन तसेच तळमळ यांनी भरलेल्या अंत:करणाने देवाच्या जवळ जाऊ. 23 आपल्याला जी आशा आहे तिला आपण चिकटून राहू कारण ज्याने आपल्याला अभिवचन दिले, तो विश्वासू आहे. 24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रेम आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. 25 आणि काही जणांना जी वाईट सवय असते तसे आपण एकत्र येण्याचे बंद करू नये, परंतु एकमेकांना उत्तजेन देऊ या, आणि तो दिवसजवळ येत असताना तसे उत्तेजन देण्याची अधिकच गरज आहे. 26 सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. 27 पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. 28 जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्याला दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मारतात. 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, ज्या रक्ताने त्याला शुद्ध केले त्या रक्ताला अपवित्र ठरविले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा! 30 कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.”पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” 31 जीवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्टी आहे. 32 ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली. 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. 34 एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता. 35 म्हणून तुमच्यामध्ये जो टृढ विश्वास होता तो सोडू नका. कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळावे. 37 आता अगदी थोडक्या अवधीनंतर,“जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही. 38 परंतु माझा धार्मिक पुरुष विश्वासाने वाचेल आणि जर तो पाठ फिरवील तर माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” हबक्कू 2:3-4 39 पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.
Total 13 अध्याय, Selected धडा 10 / 13
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13
×

Alert

×

Marathi Letters Keypad References