1. {#1इस्त्राएलाच्या पश्चात्तापाचा खोटेपणा } [QS]“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ, [QE][QS]कारण त्याने आमचे तुकडे केले आहे, आता तोच आम्हास बरे करील, [QE][QS]त्याने जखम केली, तोच आम्हास पट्टी बांधेल. [QE]
2. [QS]दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, [QE][QS]तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, [QE][QS]आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू. [QE]
3. [QS]चला आपण परमेश्वरास ओळखू या, [QE][QS]प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, [QE][QS]तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, [QE][QS]भूमीवर पाऊस पडतो, [QE][QS]त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.” [QE]
4. [QS]एफ्राईमा मी तुला काय करु? [QE][QS]यहूदा मी तुला काय करु? [QE][QS]तुमचा विश्वासू पहाटेच्या ढगाप्रमाणे, [QE][QS]आणि उडून जाणाऱ्या दवाप्रमाणे आहे. [QE]
5. [QS]म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे, [QE][QS]माझ्या तोंडाच्या शब्दाने त्यांना ठार केले आहे. [QE][QS]तुझा न्याय हा प्रकाशाप्रमाणे चमकत आहे. [QE]
6. [QS]कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो, [QE][QS]मला होमबली पेक्षा देवाचे ज्ञान प्रिय आहे. [QE]
7. [QS]आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला, [QE][QS]ते माझ्याशी अविश्वासूपणे वागले. [QE]
8. [QS]गिलाद हे दुष्टांचे शहर आहे, [QE][QS]त्यावर रक्ताची पाऊले उमटली आहे. [QE]
9. [QS]जशी लुटारुंची टोळी टपून बसते, [QE][QS]तसा याजकांचा समूह आहे, ते शखेमाच्या वाटेवर खून करतात, [QE][QS]त्यांनी महापातके केली आहेत. [QE]
10. [QS]इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे, [QE][QS]एफ्राईमाचा व्यभिचार तेथे आहे, आणि इस्राएल प्रदुषित झाला आहे. [QE]
11. [QS]तुझ्यासाठी यहूदा, हंगामाची वेळ येईल, [QE][QS]तेव्हा मी माझ्या लोकांस बंदिवासापासून मुक्त करीन. [QE]