मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
1. {देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक} [PS] परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा; [QBR] कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे. [QBR]
2. जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. [QBR] तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे. [QBR]
3. जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, [QBR] परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. [QBR] षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे. [QBR]
4. कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात [QBR] आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात. [QBR]
5. त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले व मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल. [QBR] मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही. [QBR]
6. जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी [QBR] आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत, [QBR] जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात [QBR]
7. त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन; [QBR] त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील, [QBR] कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील. [QBR]
8. ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः [QBR] मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
9. {मूर्तीपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध} [PS] रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या व खाऊन टाका! [QBR]
10. त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; [QBR] ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः [QBR] ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत. [QBR]
11. त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही; [QBR] ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे, [QBR] प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत. [QBR]
12. ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल, [QBR] तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.” [PE]

Notes

No Verse Added

Total 66 Chapters, Current Chapter 56 of Total Chapters 66
यशया 56:23
1. {देवाचा करार पाळण्याबद्दल मिळणारे पारितोषिक} PS परमेश्वर असे म्हणतो, जे योग्य आहे ते करा, जे न्याय्य आहे ते करा;
कारण माझे तारण आणि प्रामाणिकपणा प्रगट व्हावयास जवळ आहे.
2. जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो.
तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे.
3. जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये,
परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील.
षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.
4. कारण परमेश्वर म्हणतो, जे षंढ माझे शब्बाथ पाळतात
आणि मला आवडणाऱ्या गोष्टी निवडतात आणि माझा करार घट्ट धरून राहतात.
5. त्यांना आपल्या घरात आणि आपल्या भींतीच्या आत मुले मुलीपेक्षा जे उत्तम असे स्मारक देईल.
मी त्यांना सर्वकाळ राहणारे स्मारक देईल जे छेदून टाकले जाणार नाही.
6. जे विदेशीही परमेश्वराची सेवा करण्यासाठी
आणि परमेश्वराच्या नावावर प्रीती करतात, त्याच्या आराधनेसाठी स्वतःहून त्याच्याशी जोडले आहेत,
जे प्रत्येकजण शब्बाथ पाळतात आणि तो अपवित्र करण्यापासून जपतात आणि माझे करार घट्ट धरून ठेवतात
7. त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि प्रार्थनेच्या घरात मी त्यांना आनंदीत करीन;
त्यांची होमार्पणे आणि त्यांची अर्पणे माझ्या वेदीवर मान्य होतील,
कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांचे प्रार्थनेचे घर म्हणतील.
8. ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः
मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.
9. {मूर्तीपूजेबद्दल इस्राएलाचा निषेध} PS रानातील सर्व वन्य पशूंनो, जंगलातील सर्व पशूंनो या खाऊन टाका!
10. त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही;
ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः
ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे निद्राप्रीय आहेत.
11. त्या कुत्र्यांची भूक मोठी आहे; त्यांना कधीच पुरेसे मिळत नाही;
ते विवेकहीन मेंढपाळ आहेत; ते सर्व आपापल्या मार्गाकडे,
प्रत्येकजण लोभाने अन्यायी मिळकतीकडे वळले आहेत.
12. ते म्हणतात, “या, चला आपण द्राक्षरस आणि मद्य पिऊ; आजच्यासारखा उद्याचा दिवस होईल,
तो दिवस मोजण्यास अशक्य असा महान होईल.” PE
Total 66 Chapters, Current Chapter 56 of Total Chapters 66
×

Alert

×

marathi Letters Keypad References