1. {#1परमेश्वराने केलेला राष्ट्रांचा न्याय } [QS]पाहा, त्यादिवसामध्ये आणि त्यावेळी, [QE][QS]जेव्हा मी यहूदाचे व यरूशलेमेचे बंदीवान परत आणीन, [QE]
2. [QS]मी, सर्व राष्ट्रांना गोळा करून, [QE][QS]खाली यहोशाफाटाच्या दरीत आणीन. [QE][QS]कारण माझ्या लोकांकरता आणि माझे वतन इस्राएल [QE][QS]ज्यांना त्यांनी इतर राष्ट्रात पांगविले. [QE][QS]आणि त्या राष्ट्रांनी माझा देश वाटून घेतला. [QE][QS]तेथे मी त्यांचा न्यायनिवाडा करीन.
3. त्यांनी माझ्या लोकांकरता चिठ्ठ्या टाकल्या. [QE][QS]त्यांनी मुलगा देऊन वेश्या घेतली [QE][QS]आणि मद्यासाठी म्हणून मुलगी विकली. [QE]
4. [QS]सोर, सीदोन व पलिष्टीच्या सर्व प्रांतानो, आता तुम्ही माझ्यावर का रागावता? [QE][QS]तुम्ही माझी परत फेड कराल का? [QE][QS]जरी तुम्ही माझी परत फेड केली तरी, [QE][QS]मी त्वरेने तुमचा सूड तुमच्याच मस्तकावर फिरवीन. [QE]
5. [QS]तुम्ही माझे चांदी आणि सोने घेतले आहे, [QE][QS]आणि तुम्ही माझा अमूल्य खजिना आपल्या मंदिरात नेला आहे. [QE]
6. [QS]तुम्ही यहूदाच्या व यरूशलेमेच्या लोकांस [QE][QS]त्यांच्या देशातून सीमेपासून दूर न्यावे म्हणून यावान लोकांस विकले. [QE]
7. [QS]पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन, [QE][QS]आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन. [QE]
8. [QS]मी तुमच्या मुलांना आणि मुलींना [QE][QS]यहूदी लोकांच्या हाती विकीन. [QE][QS]मग ते त्यांना शबाच्या लोकांस [QE][QS]दूरच्या राष्ट्रांस विकतील. [QE][QS]कारण परमेश्वर हे बोलला आहे. [QE]
9. [QS]राष्ट्रांमध्ये ही घोषणा कराः [QE][QS]युध्दाला सज्ज व्हा, [QE][QS]बलवान मनुष्यांना उठवा, [QE][QS]त्यांना जवळ येऊ द्या, [QE][QS]सर्व लढवय्ये मनुष्ये पुढे येवोत. [QE]
10. [QS]तुमचे फाळ मोडून त्यांच्या तलवारी करा. [QE][QS]आणि कोयत्यांपासून भाले करा. [QE][QS]दुर्बल म्हणो की, [QE][QS]मी बलवान आहे. [QE]
11. [QS]तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, [QE][QS]त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. [QE][QS]हे परमेश्वरा, [QE][QS]तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर. [QE]
12. [QS]राष्ट्रे स्वतःउठून जागी होवोत, [QE][QS]आणि यहोशाफाटाच्या दरीत येवोत. [QE][QS]तेथे मी सभोवतालच्या [QE][QS]सर्व राष्ट्रांचा न्याय करायला बसेन. [QE]
13. [QS]विळा आणा, [QE][QS]कारण पीक तयार झाले आहे. [QE][QS]म्हणून तुम्ही विळा घाला, [QE][QS]या, द्राक्षे तुडवा, [QE][QS]कारण त्यांचे द्राक्षकुंड भरून गेले आहे. [QE][QS]पिंप भरून वाहत आहेत. [QE][QS]कारण त्यांची दुष्टाई मोठी आहे. [QE]
14. [QS]तेथे गलबला आहे, न्यायाच्या दरीत गलबला आहे. [QE][QS]कारण न्यायाच्या दरीत परमेश्वराचा दिवस जवळ आला आहे. [QE]
15. [QS]चंद्र आणि सूर्य काळवंडतील, [QE][QS]तारे त्यांचा प्रकाश देण्याचे थांबतील. [QE]
16. {#1यहूदाची सुटका } [QS]परमेश्वर देव सियोनेतून गर्जना करील, [QE][QS]आणि आपला आवाज यरूशलेमेतून उंचावील. [QE][QS]आकाश व पृथ्वी कापतील [QE][QS]पण परमेश्वर आपल्या लोकांस सुरक्षित स्थान, [QE][QS]आणि इस्राएलाच्या लोकांस तो दुर्ग होईल. [QE]
17. [QS]मग तुम्हास कळेल की मीच तुमचा देव परमेश्वर आहे. [QE][QS]माझ्या पवित्र पर्वतावर, म्हणजे सियोनात मी राहतो. [QE][QS]तेव्हा यरूशलेम पवित्र होईल. [QE][QS]आणि त्या नगरीतून पुन्हा कधीही परके येणार जाणार नाहीत. [QE]
18. [QS]त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, [QE][QS]टेकड्यांवरून दूध वाहील, [QE][QS]यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, [QE][QS]आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील [QE][QS]आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. [QE]
19. [QS]मिसराची नासाडी होऊन तो उजाड होईल, [QE][QS]कारण त्यांनी यहूदी लोकांवर जुलूम केला [QE][QS]अदोम ओसाड रान होईल, [QE][QS]कारण त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांचे रक्त पाडले. [QE]
20. [QS]परंतु, यहूदा सर्वकाळ वसेल, [QE][QS]आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या राहील. [QE]
21. [QS]मी त्यांच्या रक्ताचा सूड अजून घेतला नाही तो सूड मी घेईन. [QE][QS]कारण परमेश्वर सियोनात वस्ती करतो.[QE]