1. {#1इस्त्राएलाशी परमेश्वराचा वाद } [PS]आता परमेश्वर जे म्हणतो, ते ऐक. [PE][QS]मीखा त्यास म्हणाला, [QE][QS]ऊठ व पर्वतांसमोर तुझी बाजू मांड [QE][QS]आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत. [QE]
2. [QS]पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, [QE][QS]परमेश्वराचा वाद ऐका, [QE][QS]कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे, [QE][QS]आणि तो इस्राएलाशी वाद करणार आहे. [QE]
3. [QS]“माझ्या लोकांनो, मी काय केले? [QE][QS]मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? [QE][QS]माझ्या विरुद्ध साक्ष दे. [QE]
4. [QS]कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले [QE][QS]आणि दास्यत्वाच्या घरातून तुला सोडवीले, [QE][QS]मी मोशे, अहरोन व मिर्यामला तुझ्याकडे पाठवले. [QE]
5. [QS]माझ्या लोकांनो, मवाबचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा [QE][QS]आणि बौराचा मुलगा बलाम, काय म्हणाला त्याची आठवण करा, [QE][QS]त्याने शिट्टीमपासून गिलगालपर्यंत[* यार्देनच्या पूर्वेकडील किनाऱ्यावरील शिट्टीम येथे इस्राएल लोकांची शेवटची छावणी होती (यहोशवा 3:1), आणि पश्चिम किनाऱ्यावरील गिलगाल येथे वचनदत्त भूमीतील पहिली छावणी होती (यहोशवा 4:19). यार्देन नदीला चमत्कारिकरित्या पार करण्याची घटना या दोन छावणीच्या दरम्यान घडली (यहोशवा 3-4). ] येऊन त्यास कसे उत्तर दिले, [QE][QS]त्याचे स्मरण करा, हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायीपण तुमच्या लक्षात यावे.” [QE]
6. {#1परमेश्वरास काय हवे? } [QS]मी परमेश्वरास काय देऊ? [QE][QS]आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? [QE][QS]मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्या पुढे यावे का? [QE]
7. [QS]हजार मेंढ्यांनी किंवा दहा हजार तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? [QE][QS]माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? [QE][QS]माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ काय? [QE]
8. [QS]हे मनुष्या, [QE][QS]चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. [QE][QS]आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे [QE][QS]आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. [QE][QS]यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? [QE]
9. [QS]परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते. [QE][QS]जो सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो, [QE][QS]म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याच्याकडे लक्ष द्या. [QE]
10. [QS]अजूनपण वाईटाचा पैसा [QE][QS]आणि उणे धिक्कारलेले माप ही दुष्टांच्या घरांत आहेत. [QE]
11. [QS]मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वजनांची पिशवी बळगतो? [QE]
12. [QS]त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, [QE][QS]त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत. [QE][QS]त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते. [QE]
13. [QS]म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे, [QE][QS]तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे. [QE]
14. [QS]तू खाशील पण तृप्त होणार नाही, [QE][QS]तुझे रितेपण तुझ्यामध्ये राहील, [QE][QS]तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, [QE][QS]आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईन. [QE]
15. [QS]तू पेरशील, पण कापणी करणार नाही; [QE][QS]तू जैतूनांपासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील, [QE][QS]पण त्याचे तेल स्वत:ला लावणार नाही; [QE][QS]तू द्राक्ष तुडवशील, पण त्याचा रस पिणार नाही. [QE]
16. [QS]कारण अम्रीचे नियम पाळले जातात [QE][QS]आणि अहाबाच्या घराण्याची सर्व कार्ये करण्यात येतात. [QE][QS]तुम्ही त्यांच्या मसलती प्रमाणे चालता, [QE][QS]म्हणून मी तुझा व तुझ्या शहराचा नाश करीन व [QE][QS]त्याच्या रहिवाशांचा उपहास होईल [QE][QS]आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हास सोसावी लागेल. [QE]