मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना} [PS] मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा. [QBR] संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले, [QBR] माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक. [QBR]
2. अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार? [QBR] किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
3. परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे. [QBR] मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल. [QBR]
4. भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका! [QBR] तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा. [QBR]
5. न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा [QBR] आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा. [QBR]
6. बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? [QBR] परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.” [QBR]
7. त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते, [QBR] तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे. [QBR]
8. मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो, [QBR] कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 4:107
1. {सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना} PS मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.
संकटात मी असता, तेव्हा तू मला मुक्त केले,
माझ्यावर दया कर आणि माझी प्रार्थना ऐक.
2. अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार?
किती काळ तुम्ही व्यर्थतेची आवड धरणार, आणि खोट्याचा शोध घेणार? सेला
3. परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे.
मी जेव्हा परमेश्वरास हाक मारीन तेव्हा तो ऐकेल.
4. भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका!
तुझ्या पलंगावर तू आपल्या हृदयात चितंन कर आणि शांत राहा.
5. न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा
आणि परमेश्वरावर आपला विश्वास ठेवा.
6. बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल?
परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”
7. त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते,
तेव्हा त्यांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू मला दिला आहे.
8. मी अंथरूणावर पडतो आणि अगदी समाधानात झोपतो,
कारण परमेश्वरा, तुच माझे रक्षण करतोस आणि मला सुरक्षित ठेवतोस. PE
Total 150 Chapters, Current Chapter 4 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References