मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य} [PS] देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, [QBR] जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. [QBR]
2. म्हणून जरी पृथ्वी बदलली, [QBR] जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही. [QBR]
3. जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, [QBR] आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही. [QBR]
4. तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या [QBR] पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात. [QBR]
5. देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; [QBR] देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील. [QBR]
6. राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; [QBR] तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल. [QBR]
7. सेनाधीश परमेश्वर [* यहोवा-साबओथ] आमच्याबरोबर आहे. [QBR] याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे. [QBR]
8. या, परमेश्वराची कृत्ये पाहा, [QBR] त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे. [QBR]
9. तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; [QBR] तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; [QBR] तो रथ जाळून टाकतो. [QBR]
10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; [QBR] राष्ट्रात मी उंचावला जाईन; [QBR] मी पृथ्वीवर उंचावला जाईन. [QBR]
11. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; [QBR] याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 46 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 46:58
1. {देव आमचा आश्रय आमचे सामर्थ्य} PS देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे,
जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
2. म्हणून जरी पृथ्वी बदलली,
जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
3. जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या,
आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
4. तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या
पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.
5. देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही;
देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.
6. राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील;
तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
7. सेनाधीश परमेश्वर * यहोवा-साबओथ आमच्याबरोबर आहे.
याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
8. या, परमेश्वराची कृत्ये पाहा,
त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
9. तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो;
तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो;
तो रथ जाळून टाकतो.
10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे;
राष्ट्रात मी उंचावला जाईन;
मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
11. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे;
याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. PE
Total 150 Chapters, Current Chapter 46 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References