मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
यहेज्केल
1. नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते.
2. परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे.
3. लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.”
4. मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
5. परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.
6. मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत.
7. ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले.
8. माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.”
9. परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे.
10. भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल.
11. माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती.
12. पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.”‘ परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला.
13. “म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले.
14. पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील.
15. “सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.
16. “ते माझ्या पवित्र जागेत प्रवेश करतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या टेबलाजवळ येतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टींची ते काळजी घेतील.
17. ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत.
18. ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत.
19. माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत.
20. “हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील.
21. आतल्या अंगणात जाताना याजकाने द्राक्षरस पिऊ नये.
22. कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
23. “तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील.
24. याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील.
25. मृताच्या जवळ जाऊन ते अशुध्द होणार नाहीत, पण मृत व्यक्ती जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुध्द झाले तरी चालेल.
26. याजकाला शुद्ध केल्यावर, त्याने सात दिवस थांबले पाहिजे.
27. मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्र जागेची सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, तेव्हा त्याने स्वत:साठी पापार्पण करावे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
28. “लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे.
29. “त्यांना धान्यार्पणे, दोषार्पणे, पापार्पणे खायला मिळतील. इस्राएलच्या लोकांनी परमेश्वराला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची असेल.
30. प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील.
31. आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.
Total 48 अध्याय, Selected धडा 44 / 48
1 नंतर त्या माणसाने मला परत, पूर्वेकडे तोंड असलेल्या, बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी आणले. आम्ही प्रवेशद्वारा बाहेर होतो व ते बंद होते. 2 परमेश्वर मला म्हणाला, “हे बंदच राहील. ते उघडणार नाही. ह्यामधून कोणीही प्रवेश करणार नाही. का? कारण इस्राएलच्या परमेश्वराने ह्यातून प्रवेश केला. म्हणून ते बंदच राहिले पाहिजे. 3 लोकांचा राजा बंधुत्वदर्शक पदार्थ परमेश्वराबरोबर खाताना या प्रवेशद्वारात बसेल. प्रवेशद्वाराजवळच्या द्वारमंडपातून तो ये-जा करील.” 4 मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला. 5 परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा. 6 मग माझे म्हणणे ऐकण्याचे नाकारणाऱ्या इस्राएलच्या सर्व लोकांना पुढील संदेश दे. त्यांना सांग. की परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही केलेल्या भयंकर गोष्टी मला अति झाल्या आहेत. 7 ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले. 8 माझ्या पवित्र वस्तूंची तुम्ही काळजी घेतली नाही. माझ्या पवित्र जागेची जबाबदारी तुम्ही परक्यांवर टाकली.” 9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे. 10 भूतकाळात, इस्राएलने जेव्हा माझ्याकडे पाठ फिरवीली, तेव्हा लेवींनी मला सोडले. आपल्या मूर्तीना अनुसरण्यासाठी, इस्राएलने माझा त्याग केला. लेवींच्या पापाबद्दल लेवींना शिक्षा होईल. 11 माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती. 12 पण त्या लेवींनी माझ्याविरुध्द पाप करण्यात आणि त्यांच्या मूर्तींची पूजा करण्यात लोकांना मदत केली. म्हणून मी ‘त्यांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा होईल. असे वचन देतो.”‘ परमेश्वर, माझा प्रभू, हे म्हणाला. 13 “म्हणून याजकाप्रमाणे, लेवी मला अर्पण करण्यास काही आणणार नाहीत. ते माझ्या ‘पवित्र’ किंवा ‘अती पवित्र’ गोष्टींच्या जवळ येणार नाहीत. त्यांनी केलेल्या भयंकर कृत्यांचा काळिमा त्यांना वाहवा लागले. 14 पण मी त्यांना मंदिराची काळजी घेऊ देईन. ते मंदिरातील आवश्यक ती कामे करतील. 15 “सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या. 16 “ते माझ्या पवित्र जागेत प्रवेश करतील. ते माझी सेवा करण्यासाठी माझ्या टेबलाजवळ येतील. मी त्यांना दिलेल्या गोष्टींची ते काळजी घेतील. 17 ते आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारातून आत आले की तागाची वस्त्रे घालतील. आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वारात काम करताना अथवा मंदिरात सेवा करताना ते लोकरीची वस्त्रे वापरणार नाहीत. 18 ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत. 19 माझी सेवा करताना घातलेली वस्त्रे, बाहेरच्या पटांगणात लोकांमध्ये जाण्यापूर्वी ते उतरवून ठेवतील ते ही वस्त्रे पवित्र खोल्यांत ठेवतील. मग ते दुसरे कपडे घालतील. अशा प्रकारे ते त्या पवित्र वस्त्रांना लोकांना शिवू देणार नाहीत. 20 “हे याजक मुंडन करणार नाहीत वा केस लांब वाढविणार नाहीत तेव्हा ते फक्त आपले केस कातरुन बारीक करतील. 21 आतल्या अंगणात जाताना याजकाने द्राक्षरस पिऊ नये. 22 कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल. 23 “तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील. 24 याजक न्यायालयाचे न्यायाधीश असतील. लोकांना न्याय देताना ते माझे कायदे पाळतील. ते माझ्या विशेष सणांचे विधिनियम पाळतील, माझ्या खास सुट्ट्यांच्या दिवसांचा मान आणि पावित्र्य राखतील. 25 मृताच्या जवळ जाऊन ते अशुध्द होणार नाहीत, पण मृत व्यक्ती जर याजकाची स्वत:ची वडील, आई, मुलगा, मुलगी, भाऊ अथवा अविवाहित बहीण असेल, तर मात्र मृताजवळ गेले व अशुध्द झाले तरी चालेल. 26 याजकाला शुद्ध केल्यावर, त्याने सात दिवस थांबले पाहिजे. 27 मग तो पवित्र जागी जाऊ शकतो. पण ज्या दिवशी तो पवित्र जागेची सेवा करण्यासाठी आतल्या अंगणात जाईल, तेव्हा त्याने स्वत:साठी पापार्पण करावे.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. 28 “लेवींच्या मालकीच्या जमिनीबद्दल: मी त्यांची मालमत्ता आहे. त्यांना इस्राएलमध्ये तुम्ही काहीही मालमत्ता (जमीन) देऊ नका. मी त्यांचा इस्राएलमधील वाटा आहे. 29 “त्यांना धान्यार्पणे, दोषार्पणे, पापार्पणे खायला मिळतील. इस्राएलच्या लोकांनी परमेश्वराला अर्पण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांची असेल. 30 प्रत्येक पिकाच्या बहराचा पहिला भाग याजकाचा असेल. मळलेल्या पिठाचा पहिला भागसुद्धा तुम्ही याजकाला द्यावा. त्यामुळे तुमच्या घराला आशिर्वाद मिळतील. 31 आपोआप मेलेला व हिंस्र श्र्वापदांनी मारुन फाडलेला कोणताही प्राणी वा पक्षी याजकानी खाऊ नये.
Total 48 अध्याय, Selected धडा 44 / 48
×

Alert

×

Marathi Letters Keypad References