मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
स्तोत्रसंहिता
1. परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.
2. सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.
3. सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे.
4. बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास.
5. परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
6. मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
7. देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.
8. परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.
9. त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––
Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
1 परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. 2 सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. 3 सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. 4 बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. 5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा. 6 मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले. 7 देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले. 8 परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस. 9 त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे. –––––
Total 150 अध्याय, Selected धडा 99 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References