मराठी बायबल

बाइबल सोसाइटी ऑफ इंडिया (BSI)
निर्गम
1. मग मोशेने सगळया इस्राएल लोकांना एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, “ज्या आज्ञा तुम्ही पाळाव्या म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो;
2. “कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.
3. शब्बाथ दिवशी तुम्ही राहात असलेल्या जागेत कोठेही तुम्ही विस्तव देखील पेटवू नये.”
4. मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा.
5. परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ;
6. निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;
7. लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;
8. दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;
9. तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी.
10. “जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे,
11. पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या;
12. पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,
13. मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची पवित्र भाकर;
14. प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आमि दिव्यासाठी तेल;
15. धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा;
16. होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक;
17. अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा;
18. निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी आधार देणाऱ्या मेखा व तणावासाठी लागणाऱ्या दोऱ्या;
19. पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.”
20. मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले.
21. नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
22. ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.
23. ज्यांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.
24. चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले.
25. ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
26. ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले.
27. अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.
28. लोकांनी सुगंधी मसाले व जैतूनाचे तेल देखील आणले त्यांचा उपयोग सुगंधी धूप अभिषेकाचे तेल आणि दिव्याचे तेल यासाठी करण्यात आला.
29. ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.
30. तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पहा परमेश्वराने यहुदा वंशातील उरी (उरी हा हूरचा पुत्र होता) ह्याचा मुलगा बसालेल ह्याची निवड केली आहे.
31. परमेश्वराच्या आत्म्याने बसालेल याला भरले आहे त्याला सर्व प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी कसब आणि ज्ञान दिले आहे.
32. तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करील.
33. तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील.
34. परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे.
35. कोरीव काम करणारे कुशल सुतार, धातू काम करणारे कारागीर, निळया, जांभळया ज्ञान व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसवी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या. सर्व कारागिरीची कामे ते करु शकतात कारण परमेश्वराने त्यासाठी ह्या दोघांना ज्ञान व कसब दिले आहे.”
Total 40 अध्याय, Selected धडा 35 / 40
1 मग मोशेने सगळया इस्राएल लोकांना एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, “ज्या आज्ञा तुम्ही पाळाव्या म्हणून परमेश्वराने तुम्हाला दिल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो; 2 “कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे. 3 शब्बाथ दिवशी तुम्ही राहात असलेल्या जागेत कोठेही तुम्ही विस्तव देखील पेटवू नये.” 4 मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा. 5 परमेश्वरासाठी पवित्र अर्पणेगोळा करा; काय द्यावे ह्याविषयी तुम्ही प्रत्येकाने आपल्या मनात परमेश्वराकडे आणावे; सोने, चांदी, पितळ; 6 निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस; 7 लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड; 8 दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले; 9 तसेच एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने आणावी. 10 “जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे, 11 पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या; 12 पवित्र कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट, 13 मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची पवित्र भाकर; 14 प्रकाशाकरीता दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आमि दिव्यासाठी तेल; 15 धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी धूप, पवित्र निवास मंडपाच्या दारासाठी पडदा; 16 होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, पितळेचे गंगाळ व त्याची बैठक; 17 अंगणाभोवतीच्या कनातीचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या खुर्च्या, आणि अंगणाचे दार झाकण्यासाठी पडदा; 18 निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी आधार देणाऱ्या मेखा व तणावासाठी लागणाऱ्या दोऱ्या; 19 पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.” 20 मग सर्व इस्राएल लोक मोशेपुढून निघून गेले. 21 नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली. 22 ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळया स्त्री पुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली. 23 ज्यांच्याकडे निळया, जांभळया व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले. 24 चांदी व पितळ अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वराला अर्पण केले. 25 ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले. 26 ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले. 27 अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व न्यायाचा ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली. 28 लोकांनी सुगंधी मसाले व जैतूनाचे तेल देखील आणले त्यांचा उपयोग सुगंधी धूप अभिषेकाचे तेल आणि दिव्याचे तेल यासाठी करण्यात आला. 29 ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला. 30 तेव्हा मोशे इस्राएल लोकांना म्हणाला, “पहा परमेश्वराने यहुदा वंशातील उरी (उरी हा हूरचा पुत्र होता) ह्याचा मुलगा बसालेल ह्याची निवड केली आहे. 31 परमेश्वराच्या आत्म्याने बसालेल याला भरले आहे त्याला सर्व प्रकारच्या वस्तू बनवण्यासाठी कसब आणि ज्ञान दिले आहे. 32 तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीच्या वस्तू तयार करील. 33 तो हिऱ्यांना पैलू पाडून हिरे आणि रत्ने जडवून देईल. बसालेल लाकूड कामही करून त्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू बनवील. 34 परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे. 35 कोरीव काम करणारे कुशल सुतार, धातू काम करणारे कारागीर, निळया, जांभळया ज्ञान व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसवी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्या. सर्व कारागिरीची कामे ते करु शकतात कारण परमेश्वराने त्यासाठी ह्या दोघांना ज्ञान व कसब दिले आहे.”
Total 40 अध्याय, Selected धडा 35 / 40
×

Alert

×

Marathi Letters Keypad References