स्तोत्रसंहिता 132 : 1 (MRV)
1 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
स्तोत्रसंहिता 132 : 2 (MRV)
2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले. दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
स्तोत्रसंहिता 132 : 3 (MRV)
3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही. मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही. मी झोपणार नाही.
स्तोत्रसंहिता 132 : 4 (MRV)
4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
स्तोत्रसंहिता 132 : 5 (MRV)
5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी, याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
स्तोत्रसंहिता 132 : 6 (MRV)
6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले. आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
स्तोत्रसंहिता 132 : 7 (MRV)
7 आपण पवित्र तंबूत जाऊ. या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
स्तोत्रसंहिता 132 : 8 (MRV)
8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
स्तोत्रसंहिता 132 : 9 (MRV)
9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत. तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
स्तोत्रसंहिता 132 : 10 (MRV)
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी, निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
स्तोत्रसंहिता 132 : 11 (MRV)
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले. परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले. राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
स्तोत्रसंहिता 132 : 12 (MRV)
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
स्तोत्रसंहिता 132 : 13 (MRV)
13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला. त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
स्तोत्रसंहिता 132 : 14 (MRV)
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील, मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
स्तोत्रसंहिता 132 : 15 (MRV)
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन. गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
स्तोत्रसंहिता 132 : 16 (MRV)
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
स्तोत्रसंहिता 132 : 17 (MRV)
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन. मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
स्तोत्रसंहिता 132 : 18 (MRV)
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: