स्तोत्रसंहिता 148 : 1 (MRV)
1 परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 2 (MRV)
2 सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 3 (MRV)
3 सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 4 (MRV)
4 सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 5 (MRV)
5 परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली.
स्तोत्रसंहिता 148 : 6 (MRV)
6 देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
स्तोत्रसंहिता 148 : 7 (MRV)
7 पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 8 (MRV)
8 देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली.
स्तोत्रसंहिता 148 : 9 (MRV)
9 देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले.
स्तोत्रसंहिता 148 : 10 (MRV)
10 देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले.
स्तोत्रसंहिता 148 : 11 (MRV)
11 देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले.
स्तोत्रसंहिता 148 : 12 (MRV)
12 देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली.
स्तोत्रसंहिता 148 : 13 (MRV)
13 परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
स्तोत्रसंहिता 148 : 14 (MRV)
14 देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: