स्तोत्रसंहिता 82 : 1 (MRV)
1 देव देवांच्या सभेत उभा राहातो. तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
स्तोत्रसंहिता 82 : 2 (MRV)
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस? दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
स्तोत्रसंहिता 82 : 3 (MRV)
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
स्तोत्रसंहिता 82 : 4 (MRV)
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर. त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
स्तोत्रसंहिता 82 : 5 (MRV)
5 “काय घडते आहे ते त्यांनाकळत नाही. त्यांना काही समजत नाही. ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही. त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
स्तोत्रसंहिता 82 : 6 (MRV)
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
स्तोत्रसंहिता 82 : 7 (MRV)
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल, इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
स्तोत्रसंहिता 82 : 8 (MRV)
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो. देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.

1 2 3 4 5 6 7 8

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: