स्तोत्रसंहिता 90 : 1 (MRV)
1 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
स्तोत्रसंहिता 90 : 2 (MRV)
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
स्तोत्रसंहिता 90 : 3 (MRV)
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
स्तोत्रसंहिता 90 : 4 (MRV)
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
स्तोत्रसंहिता 90 : 5 (MRV)
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत.
स्तोत्रसंहिता 90 : 6 (MRV)
6 गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते.
स्तोत्रसंहिता 90 : 7 (MRV)
7 देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
स्तोत्रसंहिता 90 : 8 (MRV)
8 तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे. देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
स्तोत्रसंहिता 90 : 9 (MRV)
9 तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
स्तोत्रसंहिता 90 : 10 (MRV)
10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
स्तोत्रसंहिता 90 : 11 (MRV)
11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
स्तोत्रसंहिता 90 : 12 (MRV)
12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
स्तोत्रसंहिता 90 : 13 (MRV)
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
स्तोत्रसंहिता 90 : 14 (MRV)
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
स्तोत्रसंहिता 90 : 15 (MRV)
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस. आता आम्हांला सुखी कर.
स्तोत्रसंहिता 90 : 16 (MRV)
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु शकतोस ते त्यांना बघू दे.
स्तोत्रसंहिता 90 : 17 (MRV)
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: