निर्गम 36 : 1 (MRV)
“तेव्हा बसालेल व अहलियाब यांनी आणि परमेशवराने ज्या इतर कारागिरांना ह्या कामाच्या कसबाचे ज्ञान व समज दिली आहे त्यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे पवित्र मंडपाचे हे बांधकाम करावे.”
निर्गम 36 : 2 (MRV)
नंतर बसालेल व अहिलियाब यांना आणि ज्या कारागिरांना परमेश्वराने विशेष कसब व ज्ञान दिले होते त्यांना मोशेने बोलावले, ह्या कामात मदत व सेवा करण्याची त्या लोकांची इच्छा होती म्हणून तेही खुषीने आले.
निर्गम 36 : 3 (MRV)
इस्राएल लोकांची जी जी अर्पणे आणली होती त्यांचा देवाचे पवित्रस्थान बांधण्यासाठी त्यांनी उपयोग केला. रोज सकाळी इस्राएल लोकांनी अर्पणे आणणे चालूच ठेवले.
निर्गम 36 : 4 (MRV)
शेवटी मग सर्व कसबी कारागीर पवित्रस्थानाचे करीत असलेले आपले काम सोडून मोशेकडे आले व म्हणाले,
निर्गम 36 : 5 (MRV)
“लोकांनी खूप अर्पणे आणली आहेत! आम्हाला ह्या पवित्रस्थानाचे बांधकाम पूर्ण करवयास लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक आमच्यापाशी आले आहे!”
निर्गम 36 : 6 (MRV)
तेव्हा मोशेने सर्व छावणीभर असा हुकूम सोडला की, “कोणाही स्त्रीने किंवा पुरुषाने आता पवित्रस्थानाच्या सेवेसाठी अधिक अर्पणे आणू नयेत.” तेव्हा अशा रीतीने आणखी अर्पणे आणावयास बंदी घालण्यात आली.
निर्गम 36 : 7 (MRV)
लोकांनी हे काम पूर्ण करण्याकरता लागणाऱ्या साहित्यापेक्षा कितीतरी अधिक साहित्य अर्पण केले होते!
निर्गम 36 : 8 (MRV)
मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
निर्गम 36 : 9 (MRV)
प्रत्येक पडद्याचे मोजमाप सारखेच होते म्हणजे तो चौदावार-गज-लांब व दोन वार-गज-रुंद असे होते.
निर्गम 36 : 10 (MRV)
त्या कारागिरांनी त्यापैकी पांच पडदे जोडून एक भाग व दुसरे पांच पडदे जोडून दुसरा भाग असे दोन भाग तयार केले.
निर्गम 36 : 11 (MRV)
नंतर त्यांनी त्या दोन्हीही भागांच्या शेवटच्या किनारीवर निव्व्या सुताची बिरडी केली; तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवर ही तशीच बिरडी केली.
निर्गम 36 : 12 (MRV)
त्यानी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती.
निर्गम 36 : 13 (MRV)
नंतर ते दोन पडदे एकत्र जोडण्यासाठी त्यांनी सोन्याच्या पन्नास गोल कड्या केल्या; त्या कड्यांनी ते पडदे एकत्र जोडल्यावर त्या सर्वाचा मिळून अखंड पवित्र निवास मंडप तयार झाला.
निर्गम 36 : 14 (MRV)
नंतर पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी त्या कारागिरांनी बकऱ्याच्या केसांच्या अकरा पडद्यांचा एक तंबू बनविला.
निर्गम 36 : 15 (MRV)
ह्या सर्व पडद्यांचे मोजमाप सारखेच होते म्हणजे पंधरा वार लांब व दोन वार रुंद होते.
निर्गम 36 : 16 (MRV)
त्या कारागिरांनी त्यापैकी पाच पडदे जोडून एक भाग व दुसरे सहा पडदे जोडून दुसरा भाग तयार केला.
निर्गम 36 : 17 (MRV)
नंतर त्यांनी एका कनातीच्या बाहेरील शेकटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी व तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी केली.
निर्गम 36 : 18 (MRV)
हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या.
निर्गम 36 : 19 (MRV)
मग त्यांनी पवित्र निवास मंडप झाकण्यासाठी लाल रंग दिलेल्या. मेंढ्याच्या कातड्याचे व दुसरे तहाशाच्या कमावलेल्या कातड्याचे अशी दोन आच्छादने केली.
निर्गम 36 : 20 (MRV)
मग पवित्र निवास मंडपाला आधार देण्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या फव्व्या तयार केल्या.
निर्गम 36 : 21 (MRV)
प्रत्येक फळी पंधरा फूट लांब व सत्तावीस इंच रुंद होती.
निर्गम 36 : 22 (MRV)
त्यांनी प्रत्येक फळीच्या दोन बाजूला दोन कुसे केली व उभ्या आडव्या तुकड्यांनी त्या दोन फव्व्या एकासारख्याच केल्या.
निर्गम 36 : 23 (MRV)
त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या दक्षिण बाजूस लावण्यासाठी वीस फव्व्या केल्या;
निर्गम 36 : 24 (MRV)
मग त्या वीस फळयांच्या खाली लावण्यासाठी त्यांनी चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या, एका फळी खाली दोन म्हणजे प्रत्येक कुसाखाली एक याप्रमाणे त्या केल्या.
निर्गम 36 : 25 (MRV)
त्याचप्रमाणे पवित्र निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी वीस फळया केल्या.
निर्गम 36 : 26 (MRV)
त्यांनी त्या वीस फव्व्यासाठी एकेका फळीखाली दोन या प्रमाणे चांदीच्या चाळीस खुर्च्या केल्या.
निर्गम 36 : 27 (MRV)
पवित्र निवास मंडपाच्या मागील बाजूस म्हणजे पश्चिम बाजूस लावण्यासाठी सहा फव्व्या.
निर्गम 36 : 28 (MRV)
आणि त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या कोपऱ्यासाठी दोन फव्व्या त्यांनी केल्या.
निर्गम 36 : 29 (MRV)
ह्या फव्व्या खालच्या बाजूला जोडलेल्या होत्या आणि वरच्या भागी एकत्र गोल कडीला त्या अडकवल्या होत्या; दोन्ही कोपऱ्यासाठी त्यांनी अशाच फव्व्या केल्या.
निर्गम 36 : 30 (MRV)
तेव्हा पवित्र निवास मंडपाच्या पश्चिमबाजूस एकूण आठ फव्व्या व प्रत्येक फळी खाली चांदीच्या दोन खुर्च्या अशा सोळा खुर्च्या झाल्या.
निर्गम 36 : 31 (MRV)
त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले-पवित्र निवास मंडपाच्या एका बाजूच्या फव्व्यासाठी पाच,
निर्गम 36 : 32 (MRV)
दुसऱ्या बाजूच्या फव्व्यासाठी पाच आणि पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी पांच;
निर्गम 36 : 33 (MRV)
आणि त्यांनी फव्व्याच्या भध्याभागी लावावयाचा अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोंचेल असा केला.
निर्गम 36 : 34 (MRV)
त्या फव्व्या त्यांनी सोन्याने मढविल्या, अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले.
निर्गम 36 : 35 (MRV)
मग त्यांनी निव्व्या जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलम सणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर करूब दुतांची चित्रे शिवून घेतली,
निर्गम 36 : 36 (MRV)
आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले व ते सोन्याने मढविले;
निर्गम 36 : 37 (MRV)
मग त्यांनी पवित्र निवास मंडपाच्या प्रवेशद्वारासाठी निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा नक्षीदार पडदा बनविला.
निर्गम 36 : 38 (MRV)
व त्या पडद्यासाठी त्यांनी पाच खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या; त्यांचा वरचा भाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या; आणि खांबासाठी पितळेच्या पाच खुर्च्या बनविल्या.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38