नीतिसूत्रे 3 : 1 (MRV)
मुला, माझी शिकवण विसरु नकोस. मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या लक्षात ठेव.
नीतिसूत्रे 3 : 2 (MRV)
मी तुला ज्या गोष्टी करायला सांगतो त्या तुला अधिक दीर्घ आणि अधिक सुखी आयुष्य देतील.
नीतिसूत्रे 3 : 3 (MRV)
प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
नीतिसूत्रे 3 : 4 (MRV)
म्हणजे तू शहाणा होशील व देवाला व लोकांना तुझ्याबद्दल आनंद वाटेल.
नीतिसूत्रे 3 : 5 (MRV)
परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
नीतिसूत्रे 3 : 6 (MRV)
तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
नीतिसूत्रे 3 : 7 (MRV)
तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.
नीतिसूत्रे 3 : 8 (MRV)
तू जर हे केलेस तर ते तुझ्या शरीराला औषधाप्रमाणे बरे करील किंवा पेयाप्रमाणे तुझ्या हाडांना ताजेतवाने करील.
नीतिसूत्रे 3 : 9 (MRV)
तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. तुझ्या जवळच्या सर्वांत चांगल्या गोष्टी त्याला दे.
नीतिसूत्रे 3 : 10 (MRV)
नंतर तुझ्या सर्व गरजा पूर्ण होतील. तुझे कोठार धान्याने भरेल. आणि तुझी पिंपे द्राक्षारसाने भरुन वाहातील.
नीतिसूत्रे 3 : 11 (MRV)
मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर.
नीतिसूत्रे 3 : 12 (MRV)
का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
नीतिसूत्रे 3 : 13 (MRV)
ज्या माणसाला ज्ञान मिळेल तो खूप सुखी होईल. त्याला जेव्हा समजायला लागते तेव्हाच त्याला आशीर्वाद मिळतात.
नीतिसूत्रे 3 : 14 (MRV)
ज्ञानामुळे जे लाभ होतात ते रुप्यापेक्षा चांगले आहेत. ज्ञानापासून मिळणारे लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.
नीतिसूत्रे 3 : 15 (MRV)
ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यावान आहे. तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्यापैकी कोणतीही गोष्ट ज्ञानाइतकी मौल्यवान असणार नाही.
नीतिसूत्रे 3 : 16 (MRV)
ज्ञान तुम्हाला मोठे आयुष्य संपत्ती आणि मानसन्मान देते.
नीतिसूत्रे 3 : 17 (MRV)
ज्ञान असलेले लोक शांतीत आणि समाधानात जगतात.
नीतिसूत्रे 3 : 18 (MRV)
ज्ञान जीवनाच्या वृक्षाप्रमाणे आहे. जे लोक त्याचा स्वीकार करतात त्यांना संपूर्ण आयुष्य लाभते. जे लोक ज्ञान धारण करतात ते खरोखरच सुखी होतात.
नीतिसूत्रे 3 : 19 (MRV)
परमेश्वराने पृथ्वी निर्माण करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. परमेश्वराने आकाश निर्माण करण्यासाठी ज्ञान वापरले.
नीतिसूत्रे 3 : 20 (MRV)
परमेश्वराने समुद्र निर्माण करण्यासाठी त्याचे ज्ञान वापरले. आणि पावसाचे ढग तयार करण्यासाठी ज्ञान वापरले.
नीतिसूत्रे 3 : 21 (MRV)
मुला, तुझे ज्ञान आणि समज ही नेहमी सांभाळून ठेव. या गोष्टी सोडू नकोस.
नीतिसूत्रे 3 : 22 (MRV)
ज्ञान आणि समज तुला जीवन देतील. आणि ते अधिक सुंदर करतील.
नीतिसूत्रे 3 : 23 (MRV)
नंतर तू सुरक्षिततेचे जीवन जगशील आणि कधीही पडणार नाहीस.
नीतिसूत्रे 3 : 24 (MRV)
तू जेव्हा झोपशील तेव्हा घाबरणार नाहीस. तू विश्रांती घेशील तेव्हा तुझी झोप शांत असेल.
नीतिसूत्रे 3 : 25 (MRV)
(25-26) अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील.
नीतिसूत्रे 3 : 27 (MRV)
जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.
नीतिसूत्रे 3 : 28 (MRV)
जर तुमच्या शेजाऱ्याने काही मागितले आणि ते तुमच्याजवळ असले तर त्याला ते लगेच द्या. “त्याला उद्या यायला सांगू नका.”
नीतिसूत्रे 3 : 29 (MRV)
तुमचा शेजारी विश्वासाने तुमच्याजवळ राहातो तेव्हा शेजाऱ्याला त्रास देण्याच्या योजना आखू नका. तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेसाठी एकमेकांच्या जवळ राहता.
नीतिसूत्रे 3 : 30 (MRV)
योग्य कारणाशिवाय एखाद्याला कोर्टात नेऊ नका. जर त्याने तुम्हाला काही केले नसेल तर तसे करु नका.
नीतिसूत्रे 3 : 31 (MRV)
काही लोकांना चटकन् राग येतो. आणि ते लगेच वाईट गोष्ट करतात. तुम्ही तसे करु नका.
नीतिसूत्रे 3 : 32 (MRV)
का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.
नीतिसूत्रे 3 : 33 (MRV)
परमेश्वर वाईट लोकांच्या कुटुंबाविरुध्द असतो. परंतु जे लोक योग्य रीतीने जगतात त्यांच्या कुटुंबांना तो आशीर्वाद देतो.
नीतिसूत्रे 3 : 34 (MRV)
जर एखादा माणूस गर्विष्ठ असला आणि दुसऱ्यांची चेष्टा करत असला तर परमेश्वर त्याला शिक्षा करील आणि त्याची चेष्टा करील. पण परमेश्वर नम्र लोकांशी दयाळू असतो.
नीतिसूत्रे 3 : 35 (MRV)
शहाणे लोक सन्मान प्राप्त होईल असे जीवन जगतात परंतु मूर्ख लोक लाज वाटण्यासारखे जीवन जगतात.
❮
❯