नीतिसूत्रे 4 : 1 (MRV)
1 मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल.
नीतिसूत्रे 4 : 2 (MRV)
2 का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका.
नीतिसूत्रे 4 : 3 (MRV)
3 एकेकाळी मी सुध्दा लहान होतो. मी माझ्या वडिलांचा लहान मुलगा होतो. आणि माझ्या आईचा एकुलता एक.
नीतिसूत्रे 4 : 4 (MRV)
4 आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील.
नीतिसूत्रे 4 : 5 (MRV)
5 ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग.
नीतिसूत्रे 4 : 6 (MRV)
6 ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.”
नीतिसूत्रे 4 : 7 (MRV)
7 तुम्ही ज्ञान मिळवण्याचा निश्चय करता तेव्हाच ज्ञानाची सुरुवात होते. म्हणून तुमच्याकडे जे काही आहे त्याचा उपयोग करुन ज्ञान मिळवा. म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हाल.
नीतिसूत्रे 4 : 8 (MRV)
8 ज्ञानावर प्रेम करा म्हणजे ते तुम्हाला मोठे करील. तुम्ही ज्ञानाला महान करा म्हणजे ते तुम्हाला मान मिळवून देईल.
नीतिसूत्रे 4 : 9 (MRV)
9 ज्ञान तुमच्यासाठी सौंदर्य आणि वैभव यांचा मुकुट आहे. ते तुम्हाला मुक्त करते.
नीतिसूत्रे 4 : 10 (MRV)
10 मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील.
नीतिसूत्रे 4 : 11 (MRV)
11 मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे.
नीतिसूत्रे 4 : 12 (MRV)
12 तू जर याच मार्गाने गेलास तर तू सापळ्यात अडकणार नाहीस. तू पळू शकशील पण अडखळणार नाहीस. तू ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करशील त्यात सुरक्षित राहाशील.
नीतिसूत्रे 4 : 13 (MRV)
13 या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरु नका. ते तुमचे जीवन आहे.
नीतिसूत्रे 4 : 14 (MRV)
14 दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका.
नीतिसूत्रे 4 : 15 (MRV)
15 वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा.
नीतिसूत्रे 4 : 16 (MRV)
16 वाईट लोक कोणते तरी वाईट कृत्य केल्याशिवाय झोपू शकत नाहीत. त्यांना दुसऱ्यांना त्रास दिल्याशिवाय झोप येत नाही.
नीतिसूत्रे 4 : 17 (MRV)
17 ते दुष्टपणापासून बनवलेली भाकर खातात आणि हिंसेचे मद्य पितात. (दुष्टपणा केल्याशिवाय ते राहू शकत नाहीत.)
नीतिसूत्रे 4 : 18 (MRV)
18 चांगले लोक पहाटेच्या प्रकाशासारखे असतात. सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो.
नीतिसूत्रे 4 : 19 (MRV)
19 पण वाईट लोक रात्रीसारखे असतात. ते काळोखात हरवून जातात आणि दिसू न शकणाऱ्या वस्तूंना अडखळून पडतात.
नीतिसूत्रे 4 : 20 (MRV)
20 मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक.
नीतिसूत्रे 4 : 21 (MRV)
21 तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव.
नीतिसूत्रे 4 : 22 (MRV)
22 जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत.
नीतिसूत्रे 4 : 23 (MRV)
23 तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात.
नीतिसूत्रे 4 : 24 (MRV)
24 सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस.
नीतिसूत्रे 4 : 25 (MRV)
25 तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस.
नीतिसूत्रे 4 : 26 (MRV)
26 तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग.
नीतिसूत्रे 4 : 27 (MRV)
27 सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: