उपदेशक 1 : 1 (MRV)
हे गुरूकडून आलेले शब्द आहेत. हा गुरू दाविदाचा मुलगा आणि यरुशलेमचा राजा होता.
उपदेशक 1 : 2 (MRV)
सारे काही व्यर्य आहे. गुरू म्हणतात, “सगळे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे.
उपदेशक 1 : 3 (MRV)
आयुष्यात केलेल्या अपार कष्टांमुळे माणसाला खरोखरच काही प्राप्त होते का?नाही.
उपदेशक 1 : 4 (MRV)
लोक जगतात आणि लोक मरतात. पण पृथ्वी मात्र सदैव असते.
उपदेशक 1 : 5 (MRV)
सूर्य उगवतो आणि मावळतो. आणि नंतर तो पुन्हा त्याच ठिकाणाहून उगण्यासाठी धावपळ करतो.
उपदेशक 1 : 6 (MRV)
वारा दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे वाहतो. वारा गोल गोल घुमतो आणि नंतर त्याने ज्या ठिकाणाहून वाहायला सुरवात केली होती तिथून तो परत वाहायला लागतो.
उपदेशक 1 : 7 (MRV)
सगव्व्या नद्या पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी वाहातात. त्या सागराला जाऊन मिळतात पण समुद्र भरून जात नाही.
उपदेशक 1 : 8 (MRV)
शब्द सगव्व्या गोष्टीपूर्णपणे सांगू शकत नाहीत. पण लोक बोलणेचालूच ठेवतात. शब्द पुन्हा पुन्हा आपल्या कानावर येतात. पण आपले कान तृप्त होत नाहीत. आणि आपण जे बघतो ते बघून आपल्या डोव्व्यांचेही पारणे फिटत नाही.
उपदेशक 1 : 9 (MRV)
सुरुवातीपासून गोष्टी जशा होत्या तशाच त्या राहतात. जे आता पर्यंत करण्यात आले तेच करण्यात येणार. या आयुष्यात नवीन असे काहीच नसते.
उपदेशक 1 : 10 (MRV)
एखादा माणूस म्हणेल, “बघा हे नवीन आहे.” पण ती गोष्ट तर नेहमीच होती. आपल्याही आधी ती इथे होती.
उपदेशक 1 : 11 (MRV)
खूप पूर्वी घडलेल्या गोष्टी लोकांच्या लक्षात रहात नाहीत. आज घडलेल्या गोष्टी भविष्यात लोकांच्या लक्षात राहाणार नाहीत आणि नंतर आपल्या आधीच्या लोकांनी काय केले ते नंतरच्या लोकाच्या लक्षात राहाणार नाही.
उपदेशक 1 : 12 (MRV)
मी, गुरू उपदेशक यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.
उपदेशक 1 : 13 (MRV)
मी अभ्यास करायचा निश्चय केला आणि माझ्या शहाणपणाचा उपयोग या जीवनात ज्या गोष्टी केल्या जातात त्या शिकून घेण्यासाठी करायचे ठरवले. मला कळले की देवाने आपल्याला करायला दिलेली ही फार कठीण गोष्ट आहे.
उपदेशक 1 : 14 (MRV)
मी पृथ्वीवर केल्या गेलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिले आणि त्या सर्व गोष्टी वेळ वाया घालवण्यासारख्या आहे असे मला वाटले. त्या वारा पकडण्यासारख्याआहे असे वाटले.
उपदेशक 1 : 15 (MRV)
या गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही. जर एखादी वस्तू वाकडी असली तर ती सरळ आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही. आणि एखादी वस्तु हरवली असली, तर ती आहे तुम्ही म्हणू शकत नाही.
उपदेशक 1 : 16 (MRV)
मी स्वत:शीच म्हणालो: “मी खूप शहाणा आहे. माझ्या आधी ज्या राजांनी यरुशलेमवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी शहाणा आहे. शहाणपण आणि ज्ञान म्हणजे खरोखर काय ते मला माहीत आहे.”
उपदेशक 1 : 17 (MRV)
शहाणपण आणि ज्ञान हे मूर्खपणाच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा किती चांगले आहे हे समजून घेण्याचे मी ठरवले. पण शहाणा होणे हे वाऱ्याला पकडण्यासारखे आहे हे मला कळते.
उपदेशक 1 : 18 (MRV)
अतिशहाणपणाने निराशा येते. ज्या माणसाला खूप शहाणपण मिळते त्यालाच खूप दु:खही मिळते.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18