यशया 56 : 1 (MRV)
परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “सगळ्या लोकांशी न्याय्यबुध्दीने वागा. योग्य गोष्टीच करा. का? लवकरच माझे तारण तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझा चांगुलपणा लवकरच सर्व जगाला दिसेल.”
यशया 56 : 2 (MRV)
जो देवाचा शब्बाथचा नियम पाळतो त्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. जो माणूस पाप करीत नाही. तो सुखी होईल.
यशया 56 : 3 (MRV)
यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
यशया 56 : 4 (MRV)
(4-5) ह्या नपुसकांनी असे म्हणू नये कारण परमेश्वर म्हणतो, “ह्यातील काही शब्बाथचा नियम पाळतात. मला पाहिजे त्याच गोष्टी निवडून करतात. खरोखरच ते माझ्या कराराप्रमाणेवागतात म्हणून मी माझ्या मंदिरात त्यांच्या स्मरणार्थ एक शिला ठेवीन. माझ्या नगरात त्यांच्या नावांचे स्मरण केले जाईल. मी त्यांना संततीपेक्षा काही चांगल्या गोष्टी देईन. मी त्यांना चिरंतन राहणारे नाव ठेवीन. मी त्यांना माझ्या माणसांतून तोडून अलग करणार नाही.”
यशया 56 : 5 (MRV)
यशया 56 : 6 (MRV)
यहुदी नसलेले काही लोक परमेश्वराची सेवा करण्यासाठी आणि परमेश्वराच्या प्रेमाखातर स्वत:हून परमेश्वराला येऊन मिळतील. ते परमेश्वराचे सेवक होण्यासाठी येतील. ते शब्बाथचा दिवस हा उपासनेचा विशेष दिवस मानतील. आणि काटेकोरपणे माझ्या कराराचे (नियमांचे) सतत पालन करतील.
यशया 56 : 7 (MRV)
परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांना माझ्या पवित्र डोंगरावर आणीन. माझ्या प्रार्थनाघरात मी त्यांना सुखी करीन. त्यांनी मला अर्पण करण्यासाठी आणलेले होमबली आणि मला वाहण्यासाठी आणलेल्या वस्तू मला आवडतील. का? कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाघर होईल.”
यशया 56 : 8 (MRV)
परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला.इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”
यशया 56 : 9 (MRV)
वन्य पशूंनो, या व खा.
यशया 56 : 10 (MRV)
रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते.
यशया 56 : 11 (MRV)
ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत. त्यांचे कधीच समाधान होत नाही. मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही. ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत. ते हावरट आहेत. त्यांना फक्त स्वत:चा लाभ हवा आहे.
यशया 56 : 12 (MRV)
ते येऊन म्हणतात, “आम्ही थोडा द्राक्षरस पिऊ, आम्ही थोडे मद्य पिऊ. आम्ही उद्याही असेच करू. फक्त थोडे जास्त मद्य पिऊ.”

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12