लूक 2 : 1 (MRV)
1 त्या दिवसात कैसर औगुस्तकडून हुकुम झाला की, रोमन जगातील सर्व लोकांच्या नावांची नोंद झालीच पाहिजे.
लूक 2 : 2 (MRV)
2 ही पहिली नावनोंदणी होती. क्वीरीनिय हा सूरिया प्रांताचा राज्यपाल होता त्यावेळेस ही नावनोंदणी झाली.
लूक 2 : 3 (MRV)
3 प्रत्येक जण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गावी गेला.
लूक 2 : 4 (MRV)
4 मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
लूक 2 : 5 (MRV)
5 जिच्याशी त्याचे लग्न ठरले होते व जी गरोदर होती, त्या मरीयेसह तो तेथे नावनोंदणी करण्यासाठी गेला.
लूक 2 : 6 (MRV)
6 ते तेथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली.
लूक 2 : 7 (MRV)
7 आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला फडक्यंामध्ये गुंडाळले व गोठ्यात ठेवले, कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
लूक 2 : 8 (MRV)
8 आणि तेथे काही मेंढपाळ रात्रीच्या वेळी शेतामध्ये राहून आपले कळप राखीत होते.
लूक 2 : 9 (MRV)
9 आणि देवाचा एक दूत त्यांच्यामोर प्रगट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले. आणि ते मेंढपाळ घाबरुन गेले.
लूक 2 : 10 (MRV)
10 देवदूत त्यांना म्हणाला: “भिऊ नका, कारण मी तुम्हांला आनंदाची बातमी सांगणार आहे, जिच्यामुळे सर्व लोकांना आनंद होणार आहे.
लूक 2 : 11 (MRV)
11 कारण आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभु आहे.
लूक 2 : 12 (MRV)
12 आणि तुमच्यासाठी ही खूण असेल : फडक्यात गुंडाळलेले आणि गोठ्यात निजविलेले बाळ तुम्हांला आढळेल.”
लूक 2 : 13 (MRV)
13 आणि अचानक तेथे देवदूताबरोबर स्वर्गातील सैन्याचा समुदाय जमला. ते देवाची स्तुति करीत होते आणि म्हणत होते;
लूक 2 : 14 (MRV)
14 “स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
लूक 2 : 15 (MRV)
15 जेव्हा देवदूत त्यांना सोडून परत स्वर्गात गेले, तेव्हां मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, ‘चला, बेथलेहेमला जाऊ या आणि घडलेली जी गोष्ट देवाने आम्हांला कळविली ती पाहू या.”
लूक 2 : 16 (MRV)
16 ते घाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आढळले आणि त्यांनी गोठ्यात ठेवलेले बाळ पाहिले.
लूक 2 : 17 (MRV)
17 जेव्हा मेंढपाळांनी त्याला पाहिले तेव्हा देवदूताने त्यांना त्या बाळविषयी जे सांगितले होते ते सर्वांना सांगितले.
लूक 2 : 18 (MRV)
18 ज्यांनी हे ऐकले ते सर्व मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे चकित झाले.
लूक 2 : 19 (MRV)
19 पण मरीयेने या गोष्टी स्वत:जवळच ठेवल्या, व सतत त्याविषयी विचार करु लागली.
लूक 2 : 20 (MRV)
20 त्यांनी पाहिलेल्या आणि ऐकलेल्या सर्व गोष्टीविषयी देवाचे गौरव आणि स्तुति करीत मेंढपाळ घरी गेले: त्यांना जसे सांगण्यात आले तसेच सर्व घडले.
लूक 2 : 21 (MRV)
21 आणि जेव्हा बाळाची सुंता करण्याचा आठवा दिवस आला, तेव्हा त्याचे नाव येशू ठेवले गेले. हे नाव देवदूतांनी त्याला त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते.
लूक 2 : 22 (MRV)
22 मोशेच्या नियमाप्रमाणे जो त्यांचा शुद्धीकरणाच्या विधीचा काळ होता तो आला तेव्हा त्याला देवापुढे सादर करण्याचा विधि करण्यासाठी ते त्याला घेऊन यरुशलेमला गेले.
लूक 2 : 23 (MRV)
23 ज्याप्रमाणे प्रभूच्या नियमात लिहिले आहे;“प्रत्येक प्रथम जन्मलेला तर प्रभूला अर्पण करावा.”
लूक 2 : 24 (MRV)
24 आणि “कबुतरांच्या जोडीचा किंवा पारव्याच्या दोन पिलांचा यज्ञ करावा.”प्रभूच्या या नियमाप्रमाणे यज्ञ अर्पण करण्यास ते गेले:
लूक 2 : 25 (MRV)
25 यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
लूक 2 : 26 (MRV)
26 पवित्र आत्म्याने त्याला दाखवून दिले की, प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तो मरणार नाही.
लूक 2 : 27 (MRV)
27 आत्म्याने भरलेला तो मंदिरात गेला. आणि येशूच्या आईवडिलांनी बाळाला नियमशास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे करण्यासाठी त्याच्याजवळ आणले.
लूक 2 : 28 (MRV)
28 शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले, आणि त्याने देवाची स्तुति केली. तो म्हणाला:
लूक 2 : 29 (MRV)
29 “आता, प्रभु, आपल्या वचनाप्रमाणे आपल्या सेवकाला जाऊ दे,
लूक 2 : 30 (MRV)
30 कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
लूक 2 : 31 (MRV)
31 जे तू सर्व लोकांच्या समोर केलेस.
लूक 2 : 32 (MRV)
32 तो यहूदीतर लोकांना तुझा मार्ग प्रगट करण्यासाठी प्रकाश असा आहे. आणि तो तुझे लोक इस्राएल यांच्यासाठी गौरव असा आहे.”
लूक 2 : 33 (MRV)
33 त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
लूक 2 : 34 (MRV)
34 मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे.
लूक 2 : 35 (MRV)
35 अनेकांच्या मनातील विचार प्रगट होण्यासाठी तुझ्या जिवातून तरवार आरपार जाईल.”
लूक 2 : 36 (MRV)
36 तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी स्त्री होती. ती फनूएलाची मुलगी होती. ती अशेर वंशाची होती. ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
लूक 2 : 37 (MRV)
37 ती विधवा असून आता चौऱ्याऐंशी वर्षांची होती. तिने मंदिर कधीही सोडले नाही; उपास व प्रार्थना करुन ती रात्रंदिवस उपासना करीत असे.
लूक 2 : 38 (MRV)
38 ती त्यावेळी बालकाच्या आईवडिाांकडे आली व तिने देवाचे आभार मानले. आणि जे यरुशलेमच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
लूक 2 : 39 (MRV)
39 प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांनी सर्व पूर्ण केले व नंतर ते गालीलातील त्यांच्या नासरेथ या गावी परतले.
लूक 2 : 40 (MRV)
40 बालक वाढत होता, तो बलवान झाला, तो ज्ञानाने परिपूर्ण झाला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
लूक 2 : 41 (MRV)
41 प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरुशलेमाला जात.
लूक 2 : 42 (MRV)
42 जेव्हा तो बारा वर्षांचा झाला तेव्हा ते नेहमीप्रमाणे सणासाठी वर गेले.
लूक 2 : 43 (MRV)
43 सण संपल्यावर ते घरी परतत असता, येशू (मुलगा) मात्र यरुशलेमातच राहिला, पण त्याच्या आईवडिलांना हे माहीत नव्हते.
लूक 2 : 44 (MRV)
44 कुठल्या तरी प्रवाश्यांच्या घोळक्याबोरबर तो येत असावा असा विचार करुन पुढे एक दिवसाचा प्रवास केला. मग ते त्याला त्यांच्या नातेवाईकांमध्ये व मित्रांमध्ये शोधू लागले.
लूक 2 : 45 (MRV)
45 जेव्हा तो त्यानां सापडला नाही तेव्हा त्याला शोधण्यासाठी यरुशलेमास परत गेले.
लूक 2 : 46 (MRV)
46 असे घडले की, तीन दिवसांनंतर तो त्यांना मंदिरात सापडला, तो गुरुजनांच्यामध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
लूक 2 : 47 (MRV)
47 ज्यांनी त्याचे बोलणे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
लूक 2 : 48 (MRV)
48 जेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहिले तेव्हा ते चकित झाले. त्याच्यी आई त्याला म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का केले? तुला शोधत असताना तुझे वडील व मी अतिशय काळजीत होतो.”
लूक 2 : 49 (MRV)
49 मग येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का केलात? माझ्या पित्याचे कार्य जेथे आहे, तेथे मी असावे हे तुम्हांला माहीत नव्हते काय?”
लूक 2 : 50 (MRV)
50 परंतु त्याने हे जे उत्तर दिले ते त्यांना समजले नाही.
लूक 2 : 51 (MRV)
51 मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला. आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याची आई या सर्व गोष्टी अंत:करणात ठेवीत होती.
लूक 2 : 52 (MRV)
52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढला.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: