योहान 7 : 1 (MRV)
1 यानंतर येशू गालील प्रांतात फिरला. येशूला यहूदीया प्रांतातूल प्रवास करायला नको होता, कारण तेथील काही यहूदी लोकांना येशूला जिवे मारायचे होते.
योहान 7 : 2 (MRV)
2 यहूदी लोकांचा मंडपाचा सणजवळ आला होता.
योहान 7 : 3 (MRV)
3 म्हणून येशूचे भाऊ त्याला म्हणाले, “तू येथून सणासाठी यहूदीयात जा. म्हणजे तू करतोस ते चमत्कार तेथे तुझे शिष्य पाहू शकतील.
योहान 7 : 4 (MRV)
4 लोकांना माहिती व्हावी असे एखाघाला वाटत असेल तर त्याने तो करतो ती कामे लपवू नयेत. तू जगाला प्रगट हो. तू जे चमत्कार करतोस ते त्यांना पाहू दे.”
योहान 7 : 5 (MRV)
5 येशूच्या भावांनीसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
योहान 7 : 6 (MRV)
6 येशू आपल्या भावांना म्हणाला. ‘माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल.
योहान 7 : 7 (MRV)
7 जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगातो.
योहान 7 : 8 (MRV)
8 तेव्ह तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.”
योहान 7 : 9 (MRV)
9 हे सांगितल्यानंतर येशू गालीलातच राहिला.
योहान 7 : 10 (MRV)
10 म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही.
योहान 7 : 11 (MRV)
11 सणाच्या काळात यहूदी लोक येशूचा शोध करीत होते. यहूदी म्हणाले, “तो मनुष्य कोठे आहे?”
योहान 7 : 12 (MRV)
12 लोकांचा मोठा जमाव त्या ठिकाणी जमा झालेला होता. त्यांतील अनेक लोक येशूविषयी आपसांत बोलत होते. काही म्हणाले, “तो चांगला मनुष्य आहे.” परंतु दुसरे काहीजण म्हणाले, “नाही, तो लोकांना ठकवितो.”
योहान 7 : 13 (MRV)
13 परंतु लोकांपैकी कोणीच येशूविषयी उघडपणे बोलायला धजत नव्हते. लोकांन यहूदी पुढाऱ्यांची भीति वाटत होती.
योहान 7 : 14 (MRV)
14 अर्धअधिक सण पार पडला होता तेव्हा येशू मंदिरात गेला आणि तेथे लोकांना शिक्षण देण्यास त्याने सुरुवात केली.
योहान 7 : 15 (MRV)
15 यहूदी लोकांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, “हा माणूस शाळेत कधी शिकला नाही. हे एकढे तो कोठून शिकला?”
योहान 7 : 16 (MRV)
16 येशूने उत्तर दिले, “मी ज्या गोष्टी शिकवितो त्या माझ्या स्वत:च्या नाहीत. माझी शिकवण मला पाठविणाऱ्या पित्याकडून आलेली आहे.
योहान 7 : 17 (MRV)
17 जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो त्याला माझी शिकवण देवाकडून आहे हे कळेल. त्याला हे कळेल की, माझी शिकवण माझी स्वत:ची नाही.
योहान 7 : 18 (MRV)
18 जो कोणी स्वत:च्या कल्पना शिकवितो, तो स्वत:ला मानसन्मान मिळावा असा प्रयत्न करतो, परंतु ज्याने मला पाठविले त्याचा सन्मान करण्याचा जो प्रयत्न करतो तोच माणूस सत्य सांगतो. त्याचे काहीच खोटे नसते.
योहान 7 : 19 (MRV)
19 मोशेने तुम्हांला नियमशास्त्र दिले. खरे ना? परंतु तुमच्यातील कोणी नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही का बरे मला जिवे मारायला पाहता?”
योहान 7 : 20 (MRV)
20 लोकांनी उत्तर दिले. “तुम्हांला भूत लागले आहे. आम्ही काही तुम्हांला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत नाही.”
योहान 7 : 21 (MRV)
21 येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात.
योहान 7 : 22 (MRV)
22 मोशेने तुम्हांला सुंतेचा नियम दिला. परंतु खरे पाहता सुंता मोशेपासून आलेली नाही. ती मोशेच्या आधीच आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे. म्हणून कधी कधी शब्बाथ दिवशीही तुम्ही मुलांची सुंता करता.
योहान 7 : 23 (MRV)
23 याचा अर्थ मोशेच्या नियमांचे पालन करण्यासाठी शब्बाथ दिवशीही बालकाची सुंता करता येते. मग मी शब्बाथ दिवशी एका माणसाचे संपूर्ण शरीर बरे केले तर तुम्ही माझ्यावर का रागावता?
योहान 7 : 24 (MRV)
24 वरवर पाहून न्याय करु नका. तर खरोखर काय बरोबर आहे याची कसून शहानिशा करुन योग्य प्रकारे न्याय करा.”
योहान 7 : 25 (MRV)
25 मग यरुशलेमात राहणारे काही लोक म्हणाले, “याच माणसाला लोक जिवे मारण्याच्या प्रयत्नात आहेत.
योहान 7 : 26 (MRV)
26 परंतु सर्व लोक आपल्याला पाहू आणि ऐकू शकतील अशा ठिकाणी हा शिक्षण देत आहे. आणि शिक्षण देताना त्याला थांबविण्याचा कोणीही प्रयत्न करीत नाही. कदाचित हा खरोखरच ख्रिस्त आहे असे पुढारी लोकांनी ठरविले असेल.
योहान 7 : 27 (MRV)
27 परंतु हा माणूस कोठून आला आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि खरोखरचा ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठून येईल हे कोणालाच कळणार नाही.’
योहान 7 : 28 (MRV)
28 अजूनही येशू मंदिरात शिक्षण देत होता. येशू म्हणाला, “होय, तुम्ही मला ओळखता आणि मी कोठला हेही तुम्हांला माहीत आहे. परंतु मी स्वत:च्या अधिकाराने आलो नाही. जो खरा देव आहे त्याने मला पाठविले. तुम्ही त्याला ओळखीत नाही.
योहान 7 : 29 (MRV)
29 पण मी त्याला ओळखतो. मी त्याच्याकडून आलो आणि त्यानेच मला पाठविले.”
योहान 7 : 30 (MRV)
30 येशू हे बोलला तेव्हा लोकांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही त्याला धरु शकला नाही, कारण त्याला मारले जाण्याची वेळ अजून आली नव्हती.
योहान 7 : 31 (MRV)
31 1परंतु लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूवर विश्वास ठेवला. लोक म्हणाले, “आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत. ख्रिस्त आला तर या मनुष्याने केले त्याहून जास्त चमत्कार तो करुन दाखवील काय? नाही! म्हणून हाच ख्रिस्त असला पाहिजे.”
योहान 7 : 32 (MRV)
32 लोक येशूविषयी जे बोलत होते ते परुश्यांनी ऐकले. म्हणून मुख्य याजक आणि परुशी यांनी येशूला अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.
योहान 7 : 33 (MRV)
33 मग येशू म्हणाला, “मी तुम्हा लोकांबरोबर आणखी थोडा काळ राहीन. नंतर ज्याने मला पाठविले, त्याच्याकडे मी परत जाईन.
योहान 7 : 34 (MRV)
34 तुम्ही माझा शोध कराल पण मी तुम्हांला सापडणार नाही.”
योहान 7 : 35 (MRV)
35 यहूदी आपापसात म्हणाले, “हा माणूस असा कोठे जाणार आहे की जेथे आपण त्याला शोधू शकणार नाही? ग्रीक शहरात राहणाऱ्या यहूदी लोकांकडे हा जाईल काय? तो तेथील ग्रीक लोकांना शिक्षण देईल काय?
योहान 7 : 36 (MRV)
36 हा माणूस म्हणतो, ‘तुम्ही माझा शोध कराल परंतु मी तुम्हांला सापडणार नाही.’ तो असेही म्हणतो, ‘जेथे मी आहे तेथे तुम्ही येऊ शकत नाही.’ याचा अर्थकाय?”
योहान 7 : 37 (MRV)
37 सणाचा शेवटचा दिवस आला. तो फार महत्वाचा दिवस होता. त्या दिवशी उभे राहून येशू मोठयाने म्हणाला, “ज्याला तहान लागली असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.
योहान 7 : 38 (MRV)
38 जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवील तर त्याच्या अंत:करणातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” असे पवित्र शास्त्र सांगते.
योहान 7 : 39 (MRV)
39 येशू आत्म्याविषयी बोलत होता. लोकांना अजून पवित्र आत्मा देण्यात आला नव्हता. कारण येशू अजून मरण पावला नव्हता आणि गौरवात उठविला गेला नव्हता. परंतु नंतर येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना तो मिळणार होता.
योहान 7 : 40 (MRV)
40 येशूने सांगितलेल्या या गोष्टी लोकांनी ऐकल्या. काही लोक म्हणाले, “हा माणूस खरोखरच संदेष्टा आहे.
योहान 7 : 41 (MRV)
41 दुसरे म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” तर दुसरे काहीजण म्हणाले, “ख्रिस्त हा गालील प्रांतातून येणार नाही.”
योहान 7 : 42 (MRV)
42 पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “ख्रिस्त दावीद राजाच्या घराण्यातून येईल.”
योहान 7 : 43 (MRV)
43 आणि पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, “दावीद राजा राहत असे त्या बेथलहेम गावातून ख्रिस्त येईल.” तेव्हा येशूमुळे लोकांचे एकमत होईना.
योहान 7 : 44 (MRV)
44 काहींना येशूला अटक करायचे होते पण तसा प्रयत्न कोणीच केला नाही.
योहान 7 : 45 (MRV)
45 मदिराचे शिपाई मुख्य याजकांकडे आणि परुश्यांकडे परत गेले. मुख्य याजकांनी व परुश्यांनी शिपायांना विचारले, “तुम्ही येशूला का आणले नाही?”
योहान 7 : 46 (MRV)
46 मंदिराचे शिपाई म्हणाल, “तो बोलतो त्या गोष्टी कोणत्याही मानवी शब्दांपेक्षा महान आहेत!”
योहान 7 : 47 (MRV)
47 मग परुशी म्हणाले, “म्हणजे येशूने तुम्हांलासुद्धा मूर्ख बनविले!
योहान 7 : 48 (MRV)
48 पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही!
योहान 7 : 49 (MRV)
49 परंतु बाहेरच्या लोकांना नियसशास्त्राची माहिती नाही, त्यांच्यावर देवाचा कोप होईल!”
योहान 7 : 50 (MRV)
50 परंतु त्या घोळक्यात निकदेम हजार होता. यापूर्वी हा निकदेमच येशूला भेटायला आला होतानिकदेम म्हणाला.
योहान 7 : 51 (MRV)
51 “एखघा माणसाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय त्याला आपल्या नियसशास्त्राप्रमाणे दोषी ठरवता येत नाही.” त्याने काय केले हे कळल्याशिवाय आपण त्याचा न्याय करु शकत नाही.”
योहान 7 : 52 (MRV)
52 यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “तू सुद्धा गलील प्रांतामधील आहेस काय? पवित्र शास्त्र वाचून पाहा! गालीलातून एकही संदेष्टा येणार नाही. हे तुला कळेल.”
योहान 7 : 53 (MRV)
53 नंतर ते सर्व यहूदी पुढारी आपापल्या घरी गेले.

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53

BG:

Opacity:

Color:


Size:


Font: