योना 2 : 1 (ERVMR)
माशाच्या पोटात असतानाच योनाने त्याच्या परमेश्वर देवाची प्रार्थना केली तो म्हणाला,
योना 2 : 2 (ERVMR)
“मी फार मोठ्या संकटात सापडलो होतो. मी मदतीसाठी परमेश्वराला हाक मारली, आणि त्याने मला ओ दिली. जेव्हा मी खोल थडग्यात होतो तेव्हा, हे परमेश्वर, मी तुझी आळवणी केली आणि तू माझा आवाज ऐकलास.
योना 2 : 3 (ERVMR)
“तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.
योना 2 : 4 (ERVMR)
मग मी विचार केला, ‘की मी आता अशा ठिकाणी जावे की जिथे तू मला पाहू शकणार नाहीस.’ तरी पण मी तुझ्या पवित्र मंदिराकडे मदतीच्या आशेने पाहतच राहिलो.
योना 2 : 5 (ERVMR)
“समुद्राच्या पाण्याने मला वेढले पाण्याने माझे तोंड बुडाले आणि मी श्वासोच्छवास करु शकत नव्हतो मी खाली खूप खोल समुद्रात गेलो माझ्या डोक्याभोवती समुद्रशेवाळ गुंडाळले गेले.
योना 2 : 6 (ERVMR)
मी समुद्रतळाशी, पर्वताच्या पायथ्याशी होतो मला कायमचे असे बंदिवासात राहावे लागणार असेच मला वाटले पण माझ्या परमेश्वर देवाने मला थडग्यातून बाहेर काढले परमेश्वरा, तू मला नवजीवन दिलेस!
योना 2 : 7 (ERVMR)
“माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.
योना 2 : 8 (ERVMR)
“काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.
योना 2 : 9 (ERVMR)
फक्त परमेश्वरा मुळेच तारण मिळते “हे परमेश्वरा, मी तुला यज्ञ अर्पण करीन मी तुझे स्तवन करीन आणि कृतज्ञता व्यक्त करीन मी तुला नवस बोलेन आणि तो फेडेन.”
योना 2 : 10 (ERVMR)
मग परमेश्वर माशाशी बोलला आणि माशाने उलटी करून योनालाकोरड्या भूमीवर टाकले.
❮
❯
1
2
3
4
5
6
7
8
9
10